Mamata Banerjee: नरेंद्र मोदींनी पंतप्रधान होऊ नये, ममता बॅनर्जी यांचे मोठे भाकीत

0

कोलकाता,दि.8: Mamata Banerjee On Narendra Modi:,एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्याने नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठे भाकीत वर्तवले आहे. यावेळी पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने राज्यातील 42 पैकी 29 जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी शनिवारी संध्याकाळी पक्षाचे नवनिर्वाचित 29 खासदार, तृणमूलचे जिल्हाध्यक्ष आणि इतर नेत्यांची त्यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी बैठक घेतली. खासदार आणि तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी, जे डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत, तेही या बैठकीला उपस्थित होते.

नरेंद्र मोदींनी पंतप्रधान होऊ नये | Mamata Banerjee On Narendra Modi

नवनिर्वाचित खासदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत, मनता बॅनर्जी यांनी लोकसभेतील पक्षाच्या रणनीतीवर चर्चा केली, तसेच तृणमूल पक्षाचे नेते, उपनेते आणि लोकसभा आणि राज्यसभेतील मुख्य व्हीप यांची निवड केली. बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाले की, ‘या जनादेशानंतर भाजप नेते नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत. इंडिया आघाडीने आज सरकार स्थापनेचा दावा केला नसला तरी उद्या ते होणार नाही असे नाही. भाजप अलोकतांत्रिक पद्धतीने सरकार स्थापन करणार आहे. NDA सरकार किती दिवस टिकते ते बघूया. केंद्रातील एनडीएचे सरकार फार काळ टिकणार नाही, हे निश्चित.’

प्रत्येक परिस्थितीवर लक्ष | Mamata Banerjee

‘इंडिया’ आघाडीत तृणमूलचा समावेश करण्याबाबत बॅनर्जी पुढे म्हणाल्या, “देशाला बदलाची गरज आहे, आम्ही (तृणमूल) प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. शनिवारी झालेल्या बैठकीत आमच्या पक्षाच्या रणनीतीवर चर्चा झाली. CAA रद्द झाला पाहिजे, CAA आणि NRC रद्द करण्याची मागणी आम्ही संसदेत करणार आहोत. केंद्राला सर्व राज्यांची थकबाकी भरावी लागेल.”

भाजपवर हल्ला चढवत त्यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा चारहून अधिक जागांवर हेराफेरीच्या माध्यमातून पराभव झाल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाची भूमिका निःपक्षपाती नव्हती, ती असती तर बंगालमधून तृणमूलला 35 जागा मिळाल्या असत्या. यावेळी 192 विधानसभा मतदारसंघात तृणमूलच्या मतांची टक्केवारी जास्त होती, तर भाजपला 90 विधानसभा जागांवर.

गेल्या लोकसभा निवडणुकीत, बंगालमधील सुमारे 161 विधानसभा मतदारसंघात तृणमूलची मतांची टक्केवारी जास्त होती, तर भाजपला 121 मतदारसंघात जास्त मतदान होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगळ्या आहेत. राज्यातील पुढील विधानसभा निवडणुकीतही आम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील.

मला माफ करा

पत्रकारांशी बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या स्थापनेचा संदर्भ देत म्हटले, “मला माफ करा, परंतु मी सरकार स्थापन करण्यासाठी असंवैधानिक, बेकायदेशीर पक्षाला शुभेच्छा देऊ शकत नाही. माझ्या शुभेच्छा देशासाठी असतील, मी सर्व खासदारांना सांगेन की, पक्ष मजबूत करा. आम्ही तुमचा पक्ष (भाजप) तोडणार नाही, पण तुमचा पक्ष आतून फुटेल, तुमच्या पक्षात लोक खूश नाहीत. भाजप सरकारच्या काळात शेअर बाजारात घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोपही त्यांनी केला. निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वीच कोणी कसे काय जाहीर करू शकते? याबाबत काय कायदेशीर कारवाई करता येईल हे आम्ही (तृणमूल) पाहू.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here