Imtiaz Jaleel: संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा, इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला पोलिसांच्या भूमिकेवर संशय

Imitaz Jaleel On Chhatrapati Sambhaji Nagar: समाजकंटक दोन-अडीच तास रस्त्यावर होते

0

छत्रपती संभाजीनगर,दि.१: Imtiaz Jaleel On Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात बुधवारी मध्यरात्री तरूणांच्या दोन गटात किरकोळ वाद झाला. यानंतर जमावाने दगडफेक करण्यात सुरूवात केली. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. आता परिस्थिती नियंत्रणात असली, तरीही विरोध सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैर झडत आहेत. आता खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.

समाजकंटक दोन-अडीच तास रस्त्यावर होते | Imtiaz Jaleel On Chhatrapati Sambhaji Nagar

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जलील म्हणाले, “किराडपुरा भागात इतक्या कमी वेळेत मुलं एकत्र कोठून, कशी आली. त्या तरूणांचे कोणाबरोबर संबंध आहेत, हे सर्व शोधण्याची गरज आहे. समाजकंटक दोन-अडीच तास रस्त्यावर होते. तुम्हाला दंगल करून दगडफेक आणि गाड्या जाळायच्यात तर जाळा, अशी मोकळीक त्यांना देण्यात आली होती.”

राममंदिरात मी स्वत:हा होतो | Imtiaz Jaleel

“१३ गाड्या जाळण्यात आल्या, असं पोलीस सांगत आहेत. मग, त्या गाडीत आलेले पोलीस कुठं होते. प्रत्येकी गाडीत एकच पोलीस कर्मचारी बसला होता का? राममंदिरात मी स्वत:हा होतो. तिथे फक्त १५ पोलीस होते. या पोलिसांवर राममंदिरासह बाहेर बाहेरच्या दंगलीचीही जबाबदारी होती. तेव्हा अन्य अधिकारी आणि अधिक मागवण्यात आलेली कुमक कुठे होती?,” असा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे.

दंगल करणारे मंदिरात घुसले असते तर…

“दंगल करणारे मंदिरात घुसले असते, तर आम्ही काय करणार नाही, अशी पोलिसांची भूमिका होती. १५ पोलीस कर्मचाऱ्यांना मरण्यासाठी सोडलं होतं. बाहेर कोणी नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, अशी मोकळीक देण्यात आली होती,” असेही जलील यांनी म्हटलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here