Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar: अजित पवारांवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टपणे म्हणाले…

0

मुंबई,दि.17: Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar: राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवार काही आमदारांना बरोबर घेत भाजपाला पाठिंबा देतील अशा चर्चा रंगल्या आहेत. तर स्वतः अजित पवार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चाही सुरू आहे. अशातच अजित पवार यांनी आपले सासवडमधील सर्व कार्यक्रम अचानक रद्द केले. ते तिथे शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार होते. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे दिल्लीला पोहोचल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान आता यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपाच्या विचारधारेनुसार काम… | Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar

भाजपच्या विचारधारेनुसार काम करणार असेल तर पक्षात कोणीही आलं तरी हरकत नाही. भाजपमध्ये सर्वांसाठी स्थान आहे. आमच्याकडे देश देव धर्माला मानणारे आले तर त्यांचं स्वागत आहे. आमच्याकडे विचारधारेवर काम करावं लागतं असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. बावनकुळे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता त्यांनी अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

संजय राऊत म्हणाले…

दरम्यान अजित पवार हे भाजपसोबत जाणार का या प्रश्नावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटत नाही अजित पवार हे भाजपसोबत जातील असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. सोबतच राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. मात्र राष्ट्रवादीमधील काही जण भाजपमध्ये जाऊ शकतात असं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी अजित पवार नाराज नसल्याचं म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here