पोलिसाचा इंजिनीयर महिलेवर अत्त्याचार, फेसबुकवर झालेली ओळख

0

पुणे,दि.२३: फेसबुकद्वारे ओळख करून पोलिसांनी एका विवाहित इंजिनीयर महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पोलिसाने इंजिनीयर महिलेवर बलात्कार केला. तसेच तिचे नग्न फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. मोशी व अकुर्डी तसेच इतर वेगवेगळ्या ठिकाणी १५ सप्टेंबर २०२१ ते ११ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. 

विक्रम गणपत फडतरे (वय ३४, रा. भिलारेवस्ती, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पीडित ३० वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. २२) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम फडतरे हा पुणे शहर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेचा कर्मचारी आहे. विवाहित असलेली पीडित फिर्यादी महिला इंजिनिअर असून एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. 

पोलीस कर्मचारी असलेल्या विक्रम फडतरे याने इंजिनीयर महिलेला फेसबुक द्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर तिच्याशी मैत्री वाढवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, इंजिनीयर महिलेचे नग्न फोटो व व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीशी वारंवार मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध केले, असे फिर्यादीत नमूद आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here