पोलिसांनी स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या रॅकेटचा केला पर्दाफाश

0

ठाणे,दि.23: पोलिसांनी स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ठाणे शहरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका स्पा सेंटरमध्ये हे रॅकेट सुरू होतं. पोलिसांनी या स्पा सेंटरवर धाड टाकून कारवाई केली आहे. या प्रकरणी स्पा सेंटरच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर दोन महिलांची सुटका केली आहे.

मॉलमध्ये असलेल्या थाई स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी त्या स्पा सेंटरमध्ये एक डमी ग्राहक पाठवला. यावेळी डमी ग्राहकाला स्पामधील व्यक्तीने एका सेशनसाठी पाच हजार रुपये देण्यास सांगितले आणि डील फायनल झाली. त्यानंतर डमी ग्राहकाने पोलिसांना कळवले आणि मग पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली.

यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन महिलांची सुटका केली आहे. या ठिकाणी महिलांचा वेश्या व्यवसायासाठी वापर केला जात होता. पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका केली तर स्पा व्यवस्थापकाला अटक केली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here