हॉटेलमध्ये सुरू होता कुंटणखाना, तिघांवर गुन्हा दाखल

0

मोहोळ,दि.९: मोहोळ शहरातील तांबोळे पाटीनजीक हॉटेलमध्ये परजिल्ह्यातील महिला आणून एजंटांमार्फत कुंटणखाना चालवणाऱ्या हॉटेलमालक, एजंट व्यवस्थापक अशा तिघांच्या विरोधात मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मोहोळ पंढरपूर रस्त्यावर तांबोळे पाटीनजीक किंग द लॉयन या हॉटेलमध्ये परजिल्ह्यातील आणून कुंटणखाना चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार मियानुसार पोलीस निरीक्षक अशोक सापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण साठे, अनुसया सुतार, अमोल घोळवे यांच्या पथकाने धाड टाकली असता परजिल्ह्यातील महिला आढळून आल्या.

यानुसार हॉटेलमालक दशरथ शिंदे, एजंट जयपाल संजय पवार ( दोघेही रा. मोहोळ ) व व्यवस्थापक प्रमोद ( रा. उपळाई, ता. माढा ) यांच्याविरोधात पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे यांनी गन्हा दाखल केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here