Police Raid : डान्सबारवर टाकला पोलिसांनी छापा, पुढे जे घडले ते पाहून पोलिसांना बसला धक्का

0

मुंबई,दि.15 : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) डान्सबारवर छापा (Raid On Dancebar) टाकला. यावेळी पोलिसांना डान्सबार (Dancebar) मधील दृश्य पाहून धक्का बसला. कोरोना (Corona) आला तेव्हा दोन माणसांमधले अंतर सुद्धा वाढले. काय माहीत होते, सगळ्यांना एकमेकांपासून दूर करेल म्हणून. परंतु अशी अनेक ठिकाणे आणि प्रसंग आहेत जिथे अंतर चालत नाही. अशी जागा म्हणजे डान्सबार. मुंबईतील एका डान्सबारमध्ये अंतराचे जवळीकेत रूपांतर करण्यासाठी काचेची भिंत उभारण्यात आली होती. पण जेव्हा ती भिंत तुटली तेव्हा आतून एक थरारक सत्य बाहेर आले. ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. (Mumbai Police Raid On Deepa Dancebar)

छाप्यादरम्यान पोलिसांनी मुंबईतील दीपा डान्स बारमध्ये (Deepa Dancebar) असलेल्या मेकअप रूमच्या आरशांवर हातोडा मारला. हातोड्याचा प्रत्येक फटका काच फोडत होता. आणि आरशामागे दडलेले रहस्य हळूहळू उघड होत होते. पण प्रश्न असा होता की, शेवटी डान्सबारच्या मेकअप रूमचा काच फोडण्यामागे काय हेतू असू शकतो? या आरशांमागे काय रहस्य आहे, जे मुंबई पोलिसांना जाणून घ्यायचं होतं. काही मिनिटे प्रयत्न केल्यानंतर अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. काचेच्या मागे इलेक्ट्रॉनिक लॉक दिसत होते.

हातोड्यामुळे काचेनंतर इलेक्‍ट्रॉनिक लॉकचेही चक्काचूर झाले, तेव्हा असे धक्कादायक दृश्‍य समोर आले, जे पाहून पोलिसही काही काळ चक्रावून गेले. खरं तर, त्या डान्सबारच्या मेकअप रूममध्ये आरशांच्या मागे एक गुप्त तळघर होतं. ज्यातून एकामागून एक मुली बाहेर पडू लागल्या.

मुली बाहेर येताच मोजणी सुरू झाली. एक, दोन, तीन, चार, पाच… आणि नंतर संख्या 17 पर्यंत गेली. अखेर, 15 तासांच्या प्रदीर्घ छाप्यानंतर मुंबई पोलिसांना या डान्सबारमधून 17 मुलींना ताब्यात घेण्यात यश आले.

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला अंधेरी परिसरात असलेल्या दीपा बारबाबत गुप्त माहिती मिळाली होती. ही माहिती एका NGO कडून होती, ज्यात सांगण्यात आले होते की, दीपा बारमध्ये कोविड प्रोटोकॉलसह सर्व नियम आणि कायदे झुगारून बार गर्ल्सचा डान्सचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालतो आणि अय्यशीसोबतच अशा मुलींना पाहण्याची आवड असलेले लोक अशा मुलींवर रोज रात्री करोडो रुपये उधळतात.

या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी 11 आणि 12 डिसेंबरच्या मध्यरात्री दीपा बारवर छापा टाकला. त्या रात्रीही डान्सबारमध्ये मुलींचा डान्स बिनबोभाट सुरू असल्याची त्यांना खात्रीशीर माहिती होती. पण मुंबई पोलिसांना तेंव्हा धक्का बसला जेव्हा, बारमध्ये गेल्यावर त्यांना दिसले की बारमध्ये मद्यपान करणाऱ्या लोकांशिवाय एकही मुलगी किंवा बार गर्ल नाही. काही काळ पोलिसांचाही गोंधळ उडाला.

मात्र त्यानंतर पोलिसांनी बारमध्ये उपस्थित सर्व लोकांना थांबवून त्यांची चौकशी सुरू केली. यामध्ये बारच्या व्यवस्थापकापासून ते कर्मचारी आणि अगदी ग्राहकांपर्यंत सर्वांचा समावेश होता. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बार गर्लच्या बाबतीत सर्वांचे उत्तर नाही असेच होते. इथे मद्यपान सुरू आहे, पण नाचगाणी होत नाही, असे प्रत्येक व्यक्ती पोलिसांना सांगत होता. तर मुंबई पोलिसांचा खबऱ्या मात्र डान्सबारमध्ये अजूनही मुली लपून बसल्याचं सांगत होता.

या चौकशीत एक-दोन नव्हे तर तब्बल 14 तास उलटले. आणि पंधराव्या तासात योगायोगाने मुंबई पोलिसांना डान्सबारच्या मेकअप रूममध्ये मोठा आरसा दिसला. खरं तर, हा आरसा भिंतीला अशा प्रकारे जोडलेला होता की तो वेगळा करणे शक्य नव्हते.

मुंबई पोलिसांसाठी ही सर्वात धक्कादायक बाब होती. आता पोलिसांनी हातोड्याने काच फोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरशावरची प्रत्येक हातोडा मारल्यानंतर बार मॅनेजर, तिथले कर्मचारी, ग्राहक आणि बार डान्सर्स यांचा खरा चेहरा उघडा पडू लागला. अखेर काच फुटली आणि काचेच्या मागे भिंतीच्या आत असलेल्या गुप्त तळघराचे रहस्यही उघड झाले.

बाहेरून त्या तळघराकडे पाहिल्यावर विश्वास बसत नाही की एका खोलीच्या भिंतीच्या आत इतके घट्ट पण लांब तळघर असू शकते, जिथे इतके लोक लपून बसू शकतात. मात्र पोलिसांनी तळघराची आतून पाहणी केली असता, तेथील परिस्थिती व सुविधा पाहिल्यानंतर बारमालकाने येथील बार गर्ल्सना लपवून पोलिसांच्या नजरेतून वाचवण्यासाठी चोख बंदोबस्त केल्याचे स्पष्ट झाले.

त्या तळघरात स्प्लिट एसी बसवण्यात आला होता. खाली बसण्यासाठी गालिचा आणि चटई होती. पिण्यासाठी कोल्ड ड्रिंक्स आणि खाण्यासाठी चिप्सचीही व्यवस्था होती. त्यामुळे कोणतीही व्यक्ती कोणत्याही त्रासाशिवाय तासन्तास तिथे लपून राहू शकत होती. या खुलाशामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.आता पोलिसांनी बारचे व्यवस्थापक आणि रोखपाल यांच्यासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तेथून सापडलेल्या मुलींना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here