पोलिस अधिकाऱ्यालाच माजी सरपंचांच्या हत्या प्रकरणात चुकीचा तपास केल्यामुळे शिक्षा

0

अहमदनगर,दि.14: पोलिस अधिकाऱ्यालाच माजी सरपंचांच्या हत्या प्रकरणात चुकीचा तपास केल्यामुळे शिक्षा देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) पारनेर तालुक्यामधील निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ (Sandeep Varal) यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी खून झाला होता. या प्रकरणाचा तपास भोईटे यांनी केला. परंतु, चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवत तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे (Anand Bhoite) यांना राज्य शासनाने शिक्षा दिली आहे.

बनावट साक्षीदार दाखवले असल्याबाबत तक्रार | Anand Bhoite

काय आहे प्रकरण? | Ahmednagar News

निघोजमध्ये (ता. पारनेर) राजकीय पूर्ववैमनस्यातून संदीप वराळ यांची तलवारीने वार करुन निर्घृण हत्या झाली. सलून दुकानात दाढी करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासाची सूत्रे वेगाने फिरवण्यात आली. याप्रकरणी रंगनाथ किसन वराळ यांच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

साक्षीदारांच्या जबाबावर आक्षेप घेतला होता | Sandeep Varal

साक्षीदारांच्या जबाबावर या गुन्ह्यातील कटाचा आरोप असलेले बबन कवाद आणि मुक्तार इनामदार यांनी आक्षेप घेतला होता. त्याबाबत त्यांनी राज्य शासनाकडे तक्रार देखील केली. परंतु त्यांच्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबत धाव घेतली होती. त्यानंतर खंडपीठात हे प्रकरण चालले आणि बनावट साक्षीदार दाखवल्याप्रकरणी तपास अधिकारी आनंद भोईटे यांना दोषी धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयात तात्पुरती स्थगिती

गुन्हा दाखल झाल्यानंतर भोईटे यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात तात्पुरती स्थगिती घेतली. तर दुसरीकडे गृह विभागाने आनंद भोईटे यांची चौकशी करून ते दोषी असल्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला. त्यानंतर शासनाने आनंद भोईटे यांना पगारवाढ बंद रोखण्याची शिक्षा दिली, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, चक्क पोलिस अधिकाऱ्यालाच शिक्षा झाल्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडालीय. पोलिस अधिकाऱ्याला शिक्षा झालेल्या प्रकरणाची आता संपूर्ण राज्यभर चर्चा होत आहे. शिक्षा झालेले आनंद भोईटे हे सध्या बारामती येथे अपर पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here