आणखी एका पोलीस निरीक्षकाचे निलंबन, पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी केली कारवाई

0

सोलापूर,दि.२३: पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी आणखी एका पोलीस निरीक्षकाचे निलंबन केले आहे. सोलापूर येथील जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे (Bajrang Salunke) यांच्यावर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी शुक्रवारी निलंबनाची कारवाई केली आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातून काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे (Bajrang Salunke) यांची जेलरोड पोलीस ठाण्यात वर्णी लागली होती. परंतु काही दिवसातच साळुंखे यांना पोलीस आयुक्त बैजल यांनी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

त्यांच्या निलंबनाचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु खटला दाखल करण्याच्या कारणावरून निलंबन झाल्याची चर्चा आहे. कालच एका संशयित आरोपीच्या मृत्यूप्रकरणी फोजदार चावडीचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्यासह सात पोलिसांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर दुसन्या दिवशी पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here