दि.२४: ‘कच्चा बादाम’ गाण्यावर (Kachcha Badam Song) पोलिसांनी भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पाहिले असेल, असाच एक पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात पोलीस कर्मचारी आपल्या गणवेशातच ‘कच्चा बादाम’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहेत. नेटकरी आणि अनेक सेलिब्रिटी सुद्धा या गाण्यावर रील्स बनवून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत आहेत. तर यामध्ये पोलीस तरी मागे कसे राहतील? आपण पोलिसांना गुन्हेगारांना पकडताना पाहतो. पण तुम्ही कधी पोलिसांना नाचताना पाहिलाय का? सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात पोलीस कर्मचारी आपल्या गणवेशातच या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
पोलिसांवरही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरलेले नाही. पोलिसांचा डान्स करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओमध्ये ५ पोलीस कर्मचाऱ्यांनी ‘कच्चा बादाम’ गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ तुम्हालाही नक्कीच आवडेल.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की हे पाच पोलीस कर्मचारी एका रांगेत उभे राहून या गाण्यावर डान्स करत आहेत. यामध्ये एक महिला कर्मचारी सुद्धा आहे. या पाच कर्मचाऱ्यांमध्ये केवळ महिला कर्मचारी एकटीच बरोबर डान्स करत आहे.
हे पाचही कर्मचारी केवळ काही सेकंद डान्स करतात आणि हसू लागतात. हा मजेदार व्हिडीओ preetigoswami555 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
Ek police karmacharila nilabit Kelat tine tik tok vedio. Atta Kay zhal …….