पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांना अटक

0

मुंबई,दि.20: देह व्यापार करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. मुंबई पोलिसांनी सेक्स टुरिझमचा पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) एक मोठी कारवाई करत सेक्स टुरिझमचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्राँचने दोन महिला दलालांना अटक केली आहे. तर दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. आरोपी महिला ही दोन तरुणींना घेऊन मुंबई विमानतळावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

हे रॅकेट कसं काम करतं?

ही टोळी सर्वप्रथम ग्राहक शोधत असे. जर ग्राहक मिळाला तर त्यानंतर बोलणी अंती डील फायनल केली जात असे. यानंतर ही टोळी तरुणींना ग्राहकांसोबत संपूर्ण भारतभर फिरण्यासाठी पाठवत असे. भारतातील विविध पर्यटनस्थळांवर फिरण्यासाठी त्यांना पाठवण्यात येत होते. गोवा हे त्यांचे आवडते ठिकाण होते. यावेळी ग्राहकांसोबत देह व्यापार केला जात असे.

सर्वप्रथम मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवण्यात येत होते. ग्राहकांना मुलींचा फोटो आवडल्यानंतर गोवा किंवा इतर ठिकाणावर जाण्यासाठी फ्लाईट तिकिट स्वत: बुक करावी लागत असे.

ग्राहकांकडून ही टोळी दोन दिवसांसाठी 50 हजार रुपये घेत असे. अटक करण्यात आलेल्या आरोपी त्या मुलींकडून 20 टक्के कमिशन घेत असे. यानंतर आपल्या आवडत्या मुलीसोबत ग्राहकाला दोन दिवस फिरण्यासाठी गोवा किंवा अन्य ठिकाणी पाठवले जात असे. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा हे मुंबईला येत असतं.

मुंबई क्राईम ब्राँचच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती की, 2020 मध्ये देह व्यापार करणाऱ्या ज्या महिलेला अटक करण्यात आली होती तिच महिला आता आपल्या जोडीदारासह अन्य मार्गाने देह व्यापार करत आहे. त्यानंतर पोलिसांनी मुंबई विमानतळावर सापळा रचून कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या महिलेच्या विरोधात 370 (2) (3) आणि पिटा (PITA) कलम 4,5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here