PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरात महिलांसोबत किर्तन करायला बसले

0

नवी दिल्ली,दि.16: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रविदास जयंती 2022 निमित्त दिल्लीतील करोल बाग येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात पोहोचले. येथे गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरात प्रार्थना केली. यानंतर पंतप्रधान मोदींनी करोलबाग येथील श्री गुरु रविदास धाम मंदिरात आयोजित केलेल्या शब्द कीर्तनाला हजेरी लावली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरात उपस्थित महिलांमध्ये बसून मंजिरा वाजवला.

संत रविदासांच्या जयंतीनिमित्त मंदिर आणि मठांमध्ये कीर्तन-भजनाचे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी यात्राही काढल्या जातात. यासोबतच अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी संत रविदासांचा जन्म झाल्याचे मानले जाते. आज 16 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा साजरी होत असल्याने आजचा दिवस संत रविदासांची जयंती म्हणूनही साजरी केली जाते.

पीएम मोदी यांनी मंगळवारी सांगितलं होतं की, संत रविदासांनी जातिवाद आणि अस्पृश्यता यासारख्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी आपले जीवन समर्पित केलं होतं. माझ्या सरकारनं प्रत्येक पावलावर आणि योजनेत गुरु रविदासांची भावना आत्मसात केली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here