PM Kisan Yojana: PM किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता या दिवशी खात्यात होणार जमा

PM Kisan Yojana: पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा 13 वा हप्ता लवकरच मिळणार

0

सोलापूर,दि.28: PM Kisan 13th Installment: पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपयांचा 13 वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात. डिसेंबर ते मार्च या कालावधीत हप्ता जमा केला जाईल. 75,000 कोटी रुपयांच्या खर्चासह योजनेअंतर्गत आतापर्यंत 12 हप्ते देण्यात आले आहेत.

12 वा हप्ता या महिन्यात झाला होता जमा | PM Kisan Yojana

मागील 12 हप्ता ऑक्टोबर महिन्यात जमा झाला होता. त्यामुळं नवीन वर्षात 13 वा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

PM Kisan Yojna
पीएम किसान सन्मान निधी

12 कोटी शेतकरी लाभार्थी | PM Kisan Samman Nidhi Yojana

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) निधी केंद्र सरकारद्वारे दिला जातो, ज्याचा सुमारे 12 कोटी शेतकरी कुटुंबांना फायदा होतो. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये वर्ग केले जातात.

जाहिरात

पीएम किसान सन्मान निधी कधी जमा होणार? | PM Kisan 13th Installment

जर तुम्हीही पीएम किसानच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर या योजनेचे पैसे तुमच्या खात्यात लवकरच येतील. साधारणपणे पीएम किसानचा हप्ता दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. योजनेचा 12वा हप्ता ऑक्टोबर 2022 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला, या दृष्टिकोनातून, 13वा हप्ता शेतकऱ्यांना जानेवारीमध्ये कधीही जारी केला जाऊ शकतो.

1 कोटी 86 लाख शेतकऱ्यांना फटका

दरम्यान, PM Kisan सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. कारण हजारो शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना 11 वा आणि 12वा हप्ता मिळालेला नाही. जवळपास 1 कोटी 86 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. जर शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले तर पडताळणी होऊन उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल, अशी माहिती सरकारनं दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता नवीन वर्षात कधी मिळणार अशी चर्चा सुरु आहे. परंतू, नियमानुसार, दर तीन ते चार महिन्यांनी, 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केला जातो. त्यानुसार 13 वा हप्ता हा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here