PM Kisan Yojana:खात्यात जमा झाले नाहीत 22 व्या हप्त्याचे 2000 रुपये? येथे करा संपर्क

0

सोलापूर,दि.14: PM Kisan Yojana:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 13 मार्च 2026 रोजी ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ योजनेचा २२ वा हप्ता जारी केला आहे. आसामची राजधानी गुवाहाटी येथून डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे मोदींनी 18,640 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील 9 कोटी 32 लाख हून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळाला आहे.

पैसे मिळाले नसल्यास येथे संपर्क साधा:

जर तुमचे नाव लाभार्थी यादीत असूनही २२ व्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा झाले नसतील, तर तुम्ही खालील पत्त्यावर किंवा क्रमांकावर संपर्क साधू शकता:

ईमेल: pmkisan-ict@gov.in

हेल्पलाइन नंबर: 155261 किंवा 1800115526 (Toll Free)

पर्यायी नंबर: 011-23381092

लाभार्थी यादीत (Beneficiary List) नाव कसे तपासायचे?

१. प्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.

२. तेथे ‘Farmers Corner’ सेक्शनमध्ये ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.

३. आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर भरून “Get Report” वर क्लिक करा.

४. जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहिती नसेल, तर ‘Know Your Registration Number’ या पर्यायावर क्लिक करून आधार किंवा मोबाईल नंबरच्या मदतीने तो मिळवू शकता.

हप्ता का अडकू शकतो?

e-KYC पूर्ण नसणे.

• बँक खाते आधारशी लिंक (Aadhaar Seeding) नसणे.

• जमिनीची कागदपत्रे (Land Records) अपडेट नसणे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here