IT Raids in Kanpur: इन्कम टॅक्सच्या छाप्यात जप्त करण्यात आलेल्या नोटा नेण्यासाठी मागवला कंटेनर

0

कानपूर,दि.25: IT Raids in Kanpur: प्राप्तिकर खात्याने (Income Tax) टाकलेल्या छाप्यात जप्त करण्यात आलेल्या नोटा नेण्यासाठी कंटेनर मागवला. कन्नौजचे परफ्यूमचे (अत्तर) मोठे व्यापारी पीयूष जैन (Piyush jain) याच्या घरी जीएसटी व प्राप्तिकर खात्याने मारलेल्या छाप्यात सुमारे 177 कोटी रुपयांचे घबाड हाती लागले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नाेटा माेजण्यासाठी अधिकाऱ्यांना सहा यंत्रे न्यावी लागली. जैन यांचे कन्नाैज येथील घर सील करून मुलगा प्रत्युषला अटक करण्यात आली आहे.

पीयूष जैनच्या कानपूरच्या ठिकाणाहून 177 कोटी, कन्नौजमधून 4 कोटी जप्त

गुरुवारी आयकर विभागाच्या पथकाने कन्नौजचे मोठे परफ्यूम व्यावसायिक पीयूष जैन यांच्या निवासस्थानावर आणि ठिकाणांवर छापे टाकले. मुंबई, कन्नौज आणि कानपूर येथील ठिकाणी छापे टाकण्यात आले. तिन्ही ठिकाणी एकाच वेळी सुरू झालेली ही कारवाई दोन-तीन दिवस चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एक टीम कन्नौजला गेली, तर दुसरी कानपूरला राहिली. गुरुवारी सकाळी कानपूर आणि कन्नौजसह मुंबईतील पियुषच्या सर्व ठिकाणांवर पथकांनी एकाचवेळी छापे टाकले. कानपूरमध्ये टीमला आतापर्यंत 177 कोटी रुपये मिळाले आहेत,तर कन्नौजमध्ये 4 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. आता कारवाई केली जाईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here