देशातील या राज्यातील माणसं दीर्घायुषी,कोणत्या राज्यात किती वर्ष जगतात लोक?

0

दि.16: देशातील प्रत्येक राज्यात लोकांचं सरासरी आयुष्य, वय वेगवेगळं असतं. काही राज्यात लोकांचं सरासरी आयुष्य 75 वर्षांपर्यंत, तर काही राज्यात 70 वर्षापर्यंत आयुमर्यादा आहे.

निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या व्यक्ती अधिक वर्षांपर्यंत जगू शकतात, त्यांचं आयुष्य अधिक असतं असा समज आहे. पण असं असतंच असं नाही. दिल्ली-मुंबईतील लोकही अधिक वर्ष जगतात आणि याबाबतचा एक रिपोर्ट समोर आला आहे.

या रिपोर्टमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर केरळ आहे. केरळमध्ये राहणाऱ्या लोकांचं सरासरी आयुष्य 75.2 वर्ष आहे. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे. दिल्लीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. परंतु येथील लोक सरासरी 74.7 वर्ष जगतात.

तिसऱ्या क्रमांकावर जम्मू-काश्मीर आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राहणारे लोक सर्वसाधारणपणे दिल्लीइतकेच 74.1 वर्ष जगतात. चौथ्या नंबरवर हिमाचल प्रदेश आहे, इथे लोक सरासरी 72.6 वर्ष जगतात.

या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात लोकांचं सरासरी आयुष्य 72.5 वर्ष आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here