Paytm: पेटीएमचे संस्थापक विजय शंकर शर्मा यांना अटक

0

नवी दिल्ली,दि.13: Paytm: दिल्ली पोलिसांनी पेटीएमचे संस्थापक (Paytm Founder) विजय शंकर शर्मा (Vijay Shankar Sharma) यांना 22 फेब्रुवारी रोजी रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी अटक केली होती. मात्र, नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. खरं तर, मदर इंटरनॅशनल स्कूलसमोर शर्मा यांनी दक्षिण दिल्लीच्या डीसीपी बेनिता मेरी जेकर यांच्या कारला त्यांच्या जग्वार लँड रोव्हर कारने भरधाव वेगात धडक दिली. त्यावेळी डीसीपीचा चालक दीपक अरबिंदो मार्गावर पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. धडक दिल्यानंतर शर्मा आपल्या गाडीतून पळून गेले.

त्यानंतर दीपकने गाडीचा क्रमांक नोंदवून सर्व प्रकार डीसीपींना सांगितला. डीसीपीच्या आदेशानुसार, दीपकने मालवीय नगर पोलिस ठाण्यात आयपीसी 279 अंतर्गत गुन्हा दाखल केला. कारचा क्रमांक गुरुग्राममधील एका कंपनीचा असल्याचे निष्पन्न झाले. कंपनीच्या लोकांनी सांगितले की ती कार 2 मध्ये राहणारे विजय शंकर शर्मा यांच्याकडे आहे. त्यानंतर विजय शंकर शर्मा यांना पोलिस ठाण्यात बोलावून अटक करण्यात आली. त्यानंतर जामीनपात्र कलम असल्याने त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

हेही वाचा आमदाराच्या कारने 22 जणांना चिरडलं, संतप्त जमावाने नेत्यालाही धुतले

दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्या सुमन नलवा यांनी पुष्टी केली की पोलिसांनी विजय शेखर शर्माला वेगात व निष्काळजीपणे गाडी चालवल्याबद्दल अटक केली होती आणि नंतर त्याला जामिनावर सोडले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विजय शेखर शर्मा-प्रवर्तित पेटीएम पेमेंट्स बँकेला बँकेत आढळलेल्या “मटेरिअल पर्यवेक्षकीय चिंता” दरम्यान नवीन खाती उघडणे थांबवण्यास सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here