Pandharpur Accident | पंढरपुरात भीषण अपघातात ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळला, ५ ठार

Pandharpur Accident | अपघातात तीन महिलांसह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे

0

सोलापूर,दि.१४: Pandharpur Accident | पंढरपूर तालुक्यात भीषण अपघातात ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळून ५ ठार झाल्याची घटना घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील (Pandharpur Accident) करकंब परिसरात ऊसतोड कामगारांना‌ घेऊन‌ जाणारा ट्रॅक्टर उजनी कालव्यात पडल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या अपघातात तीन महिलांसह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात | Pandharpur Accident

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील एक ट्रॅक्टर मंगळवारी ऊसतोड मजुरांना उसाच्या फडात घेऊनजात होता. मात्र रात्री ११ वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उजनी कालव्यात पडल्याने मोठी दुर्घटना घडली. यामध्ये पाच जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. तसंच काही जण जखमीही झाले आहेत.

Pandharpur Accident

जखमी मजुरांना करकंब येथील रुग्णालयात केले दाखल

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी मजुरांना‌ करकंब येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. तसंच याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here