पेशावर,दि.4: Pakistan: पाकिस्तानातील पेशावर (Peshawar) शहरात शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मशिदीत झालेल्या स्फोटात किमान 30 जण ठार तर 50 हून अधिक जखमी झाले. एका बचाव अधिकाऱ्याने सांगितले की, किसा खवानी बाजार भागातील जामिया मशिदीत लोक शुक्रवारची नमाज अदा करत असताना हा स्फोट झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे. आम्ही स्फोटाचे स्वरूप तपासत आहोत परंतु प्रथमदर्शनी हा आत्मघाती हल्ला होता असे दिसते. मृत्यूची पुष्टी करताना पेशावरच्या लेडी रीडिंग रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद असीम खान म्हणाले, “आम्ही रुग्णालयांमध्ये इमरजेंसी घोषित केली आहे.”
एका बचाव अधिकाऱ्याने सांगितले की, किस्सा खवानी बाजार भागातील जामिया मशिदीत लोक शुक्रवारची नमाज अदा करत असताना हा स्फोट झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
Home आंतरराष्ट्रीय Pakistan: पाकिस्तानातील पेशावर मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी स्फोट, 30 ठार, 50 जखमी