Oscar Awards: RRR मधील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर!

0

नवी दिल्ली,दि.13: Oscar Awards: एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यानं (Naatu Naatu) ऑस्कर पुरस्कार (Oscar Awards 2023) पटकावला आहे. ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्या आरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्यानं ऑस्कर आपल्या नावावर केला आहे. नाटू नाटू या गाण्यानं ऑस्कर पटकावत इतिहास रचला आहे.  कालभैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांच्या आवाजातील या गीताला ऑस्कर मिळाल्याची घोषणा व्यासपीठावरून झाली आणि आरआरआरच्या चमूने एकच जल्लोष केला.

हेही वाचा Rashtrawadi Punha: थेट रशियात ‘राष्ट्रवादी पुन्हा’ व्हिडिओची चर्चा

परफॉर्मन्सला मिळाले ‘स्टँडिंग ओव्हेशन | Oscar Awards

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात गायक काल भैरव (Kaala Bhairava) आणि राहुल सिपलीगुंज (Rahul Sipligunj) यांनी यांनी ‘नाटू नाटू’ हे गाणं गायलं. या दोघांच्या परफॉर्मन्सने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची मनं जिंकली. काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्यांना ‘स्टँडिंग ओव्हेशन’ मिळाले. 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील ‘नाटू नाटू’ गाण्याच्या परफॉर्मन्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

RRR चित्रपट

आरआरआर हा चित्रपट बनवण्यासाठी 550 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या चित्रपटाने जगभरात 1224 कोटींची कमाई केली आहे. एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला तेलुगू भाषेतील एपिक ॲक्शन ड्रामा चित्रपट. हा चित्रपट दोन वास्तविक जीवनातील भारतीय क्रांतिकारक, त्यांची काल्पनिक मैत्री आणि ब्रिटिश राजवटीविरुद्धचा त्यांचा लढा याभोवती केंद्रित आहे.

या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी 1920 मधील ब्रिटिशकालीन भारतातील स्वतंत्र सेनानी कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामाराजू यांच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यासह ब्रिटीश कलाकार रे स्टीवेन्सन, एलिसन डूडी आणि ओलिविया मॉरिस यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

आरआरआरच्या टीमनं ऑस्करला लावली हजेरी | Oscar Awards 2023

अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर तसेच आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली, संगीतकार एम एम कीरावानी यांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यासाठी राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी ऑल ब्लॅक लूक केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here