शिवसेनेना आमदार मंगेश कुडाळकर यांना व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेल, एकाला अटक

0

दि.२४: शिवसेना (shivsena) आमदाराला अश्लील व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. महिला बोलत असल्याचे भासवत अश्लील व्हिडिओ कॉल करून शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर (MLA Mangesh Kudalakr) यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber ​​Police) राजस्थान (rajsthan) येथून अटक केली. मौसममुद्दीन खान असे त्याचे नाव असून आमदारांना केलेला कॉल रेकॉर्डिंग करून मॉर्फिंगद्वारे (Morphing) त्याला अश्लील स्वरूप देण्यात आले होते. या गुन्ह्यात मौसममुद्दीन याचे अन्य काही साथीदार असून स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू आहे.

आपण अडचणीत असून मदतीची गरज असल्याचे संदेश मंगेश कुडाळकर यांच्या मोबाइलवर आला. कुणी अडचणीत असेल त्याला मदत मिळायला हवी, या भावनेने कुडाळकर यांनी संदेश आलेल्या क्रमांकांवर संपर्क केला. फोनवर बोलणारी एक महिला होती. ती व्हॉट्सॲपवर वारंवार संदेश धाडत व्हिडीओ कॉल करीत होती. वारंवार कॉल येत असल्याने कुडाळकर यांनी तिचा व्हिडिओ कॉल स्वीकारला. मात्र बोलताना काही आक्षेपार्ह आढळल्याने त्यांनी कॉल कट केला. या कॉलनंतर कुडाळकर यांना पैशासाठी धमकावले जाऊ लागले. आपण केलेल्या अश्लील व्हिडीओ कॉलचे रेकॉर्डिंग केली असून ते नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये व्हायरल करण्याची धमकी देणारे संदेश त्यांना येऊ लागले.

प्रकरण फसवणुकीचे आहे, हे लक्षात आल्यावर कुडाळकर यांनी सायबर पोलिसांत तक्रार केली. लोकप्रतिनिधींना अशाप्रकारे धमकाविले जात असल्याचे याची गंभीर दखल घेत पश्चिम विभाग सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शर्मिला सहस्त्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सविता शिंदे यांच्यासह मंगेश मजगर, राहुल खेत्रे, गणेश शिर्के, दीपक पडळकर, अनिल वारे यांच्या पथकाने हा कॉल करणाऱ्या मौसममुद्दीन याला राजस्थानमधून शोधून काढले. आधुनिक तंत्रज्ञान आणि मॉर्फिग प्रणालीचा वापर करून मौसममुद्दीन आणि त्याच्या टोळीने अनेकांना ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here