दि.31: Omicron Variant: ओमिक्रॉनमुळे (Omicron) संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार (Omicron Variant) प्रथम दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळला. येथील वायरोलॉजिस्ट वोल्फगँग प्रीझर यांनी सर्वात आधी ओमायक्रॉन व्हेरिअंटची ओळख पटवली होती. स्थानिक मीडियाला दिलेल्या मुलाखतीत, प्रोफेसर वोल्फगँग यांनी कोविड-19 ची (Covid -19) झपाट्याने वाढणारी प्रकरणे आणि नवीन प्रकाराबाबत अतिशय आश्चर्यकारक माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की मोठ्या लोकसंख्येला ओमिक्रॉनची लागण होण्याची शक्यता आहे.
प्रोफेसर वोल्फगँग यांनी चेतावणी दिली, ‘हा नवीन प्रकार अतिशय संसर्गजन्य आहे. या प्रकाराचा संसर्ग टाळणे जवळजवळ अशक्य आहे. यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेत लवकरच त्याची प्रकरणे कमी होतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. तेथे, ओमिक्रॉनच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने घट होत आहे. प्रोफेसर वोल्फगँग यांनी लोकांना सावध केले, ‘ओमिक्रॉन हे पूर्वीच्या स्ट्रेनपेक्षा कमी धोकादायक असू शकते, परंतु आम्ही अजूनही या प्रकारामुळे रुग्ण मरताना पाहत आहोत.’
ओमिक्रॉनचे पहिले प्रकरण नोव्हेंबरमध्ये आढळून आले. तेव्हापासून जगभरात त्याची प्रकरणे दुपटीने वाढली आहेत. प्राथमिक डेटा सूचित करतो की इतर प्रकारांच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरीयंटचा प्रभाव कमी आहे, परंतु शास्त्रज्ञ अजूनही चेतावणी देत आहेत की वाढलेल्या प्रकरणांमुळे आरोग्य यंत्रणेवर दबाव येऊ शकतो. प्रोफेसर वोल्फगँग म्हणाले, ‘आतापर्यंत हा सामान्य सर्दी विषाणू असल्याचे सिद्ध झालेले नाही, परंतु चांगली बातमी अशी आहे की तो त्या दिशेने वाटचाल करत आहे. तथापि, वाईट बातमी अशी आहे की अशा प्रकारासह संसर्ग टाळणे अशक्य होईल.
प्रोफेसर वोल्फगँग म्हणाले, ‘ओमिक्रॉन किती वेगाने पसरतो आणि संक्रमितांची संख्या किती वेगाने वाढते हे आम्ही पाहिले आहे. त्यांनी चेतावणी दिली की त्यातील बरेच रुग्ण लक्षणे नसलेले आहेत, जे रोग पसरवण्याचे काम करतात. मी म्हणेन की पुढील काही महिन्यांत बहुतेक लोकसंख्येला याची लागण होईल. ते म्हणाले की ज्या प्रकारे प्रकरणे वाढली आहेत, रूग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अजूनही कमी आहे.
“ओमिक्रॉन व्हेरिअंट किती वेगानं पसरतोय ते आपण पाहातच आहोत. यातील बहुतांश रुग्ण असिम्टमॅटिक स्वरुपाचे असले तरी पुढील काही महिन्यात जगातील बहुतांश लोकसंख्या ओमिक्रॉनच्या विखळ्यात विळख्यात सापडलेली असेल”, असा सूचक इशारा वोल्फगँग यांनी दिला आहे.