दि.5: Omicron: कोरोनाने (Covid-19) जगभर हाहाकार उडाला आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरीयंटमुळे (Delta Variant) दुसऱ्या लाटेत (Covid Second Wave) अनेकांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशातच कोरोनाची तिसरी लाट (Covid Third Wave) आली. कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रॉन व्हेरीयंटमुळे (Omicron Variant) आली. देशात अनेकांचे लसीकरण (Vaccination) झाले असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम कमी गंभीर होता. आता ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दलची नवी माहिती समोर आली आहे.
उंदरांमधून कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची उत्पत्ती झाली असावी अशी शक्यता चिनी शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. कोरोना विषाणू माणसांमधून उंदरांपर्यंत पोहोचला आणि मग अनेक म्युटेशननंतर माणसांमध्ये परत आला, याबद्दलचे पुरावे चिनी शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. माणसांमध्ये सापडलेले ओमायक्रॉन व्हेरिएंटचे पाच व्हेरिएंट उंदरांच्या फुफ्फुसांमध्ये सापडलेल्या म्युटेशनसारखेच असल्याचं शास्त्रज्ञांना आढळून आलं आहे.
तिआंजिनमधल्या नानकाई विद्यापीठ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिजीज कंट्रोल एँड प्रिव्हेंशनच्या संशोधकांनी याबद्दल संशोधन केलं. बायोसेफ्टी अँड बायोसिक्युरिटी जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ओमायक्रॉनचं मूळ शोधण्याचा प्रयत्न संशोधकांकडून सुरू आहे. यात ५० हून अधिक म्युटेशन होतात. आधीच्या कोणत्याच व्हेरिएंटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात म्युटेशन झालेली नाहीत.
Home विज्ञान आणि तंत्रज्ञान Omicron: कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांचा उंदराबाबत मोठा दावा