Omicron: ICMR ने Omicron ने संक्रमित झालेल्यांबद्दल दिली चांगली बातमी

0

दि.27: Omicron: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की ओमिक्रॉनमधून (Omicron) बरे झाल्यानंतर विकसित होणारे अँटीबॉडी कोरोनाच्या डेल्टा प्रकार तसेच इतर Covid-19 (कोविड-19) प्रकारांविरुद्ध प्रभावी आहे.

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरीएंट (Omicron Variants) हा मागील डेल्टा व्हेरीएंटपेक्षा (Delta Variants) कमी प्राणघातक असल्याचे मानले जाते आणि तज्ञांचे म्हणणे आहे की डेल्टा व्हेरीएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरीएंटने संक्रमित लोकांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोका 50-70 टक्के कमी आहे. देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे.

हेही वाचा Solapur: केतन अंबुलगे सोलापूरातील तरुणांसमोर ठेवला आदर्श, सोलापूरातच सुरू केला व्यवसाय

मात्र, Omicron च्या रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की ओमिक्रॉनमधून बरे झाल्यानंतर शरीरात तयार होणारे अँटीबॉडी डेल्टासह इतर कोविड-19 प्रकारांविरूद्ध प्रभावी आहेत.

हेही वाचा infertility: या सवयीमुळे पुरुषांच्या याच्यावर असा होतो परिणाम, लगेच सोडा ही सवय

संसर्ग होण्याची शक्यता कमी

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या शास्त्रज्ञ प्रज्ञा डी यादव, गजानन एन सपकाळ, रीमा आर सहाय आणि प्रिया अब्राहम यांनी केलेल्या संशोधनानुसार, Omicron ची लागण झालेल्या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली आहे, जी डेल्टासह कोरोनाच्या इतर प्रकारांना प्रभावहीन करू शकते. ओमिक्रॉनपासून विकसित अँटीबॉडीज कोरोनाच्या इतर प्रकारांवरही खूप प्रभावी आहेत.

या संशोधनात 39 जणांचा सहभाग होता

या संशोधनात सहभागी झालेल्या 39 लोकांमध्ये भारताव्यतिरिक्त इतर देशांतील लोकांचाही समावेश होता. 39 लोकांपैकी 28 यूएई, दक्षिण/पश्चिम/पूर्व आफ्रिका, मध्य पूर्व, यूएस आणि यूकेमधून परतले होते आणि 11 लोक त्यांच्या संपर्कात आले होते. या सर्व लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली होती.

यापैकी 25 जणांनी कोविशील्ड लस घेतली होती, 8 जणांनी फायझरची लस घेतली होती आणि 6 जणांनी कोणतीही लस घेतली नव्हती. बरे झाल्यानंतर, सर्व लोकांमध्ये एक चांगली रोगप्रतिकारक शक्ती दिसून आली, ज्यामुळे कोरोनाचे इतर प्रकार निष्क्रिय होऊ शकतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here