Omicron मुळे या देशामध्ये 25000 ते 75,000 मृत्यू होऊ शकतात, अभ्यासातून धक्कादायक माहिती आली समोर

0

Omicron News : कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनची (Omicron Variant) प्रकरणे जगभरात वाढत आहेत. जगभरातील शास्त्रज्ञांना भीती आहे की, कोविडचा हा नवीन प्रकार जगात पुन्हा एकदा महामारीला धोकादायक बनवू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने देखील ओमिक्रॉनला (Omicron) चिंतेच्या प्रकारात समाविष्ट केले आहे. नवीन प्रकारावर, आता यूकेच्या (UK) शास्त्रज्ञांचा एक नवीन अभ्यास आला आहे, ज्याचे निष्कर्ष भयावह आहेत.

अतिरिक्त सुरक्षा उपाय न केल्यास पुढील वर्षी एप्रिलपर्यंत यूकेमध्ये कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे 25,000 ते 75,000 मृत्यू होऊ शकतात, असा या अभ्यासात इशारा देण्यात आला आहे. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि दक्षिण आफ्रिकेतील स्टेलेनबॉश विद्यापीठाच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

Omicron इतर देशांच्या तुलनेत UK मध्ये अधिक वेगाने पसरत आहे. या प्रकाराची 600 हून अधिक प्रकरणे येथे दररोज नोंदवली जात आहेत. ही प्रकरणे यापेक्षा जास्त असू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. अभ्यासानुसार, सर्वोत्तम परिस्थितीत, जर आपण असे गृहीत धरले की ओमिक्रॉनची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे आणि बूस्टरचे उच्च डोस प्रभावी आहेत, तर हॉस्पिटलायझेशन दर 60 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

अभ्यासात म्हटले आहे, ‘पुरावा असे सूचित करतो की इंग्लंडमधील Omicron B.1.1.1.529 प्रकारामुळे, SARS-CoV2 वेगाने पसरेल. जर कठोर उपाययोजना केल्या नाहीत, तर अल्फापेक्षा अधिक क्षमतेने त्याची प्रकरणे वाढतील. ओमिक्रॉनच्या वेगाने पसरण्याची आणि प्रतिकारशक्ती टाळण्याच्या क्षमतेमुळे याचा अंदाज लावला जात आहे.

ओमिक्रॉन प्रकार युरोपमध्ये, विशेषतः यूके आणि डेन्मार्कमध्ये वेगाने पसरला आहे. तथापि, असे कोणतेही संकेत नाहीत की यामुळे अधिक गंभीर रोग होऊ शकतात. आतापर्यंतच्या सर्व माहितीनुसार, डेल्टाच्या तुलनेत या प्रकाराची लक्षणे खूपच सौम्य आहेत. मात्र त्याची प्रकरणे वाढत असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतातही अनेक मोठ्या शहरांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार होत आहे. देशात आतापर्यंत 38 प्रकरणे समोर आली आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here