Odisha Train Accident: असा झाला ओडिशा रेल्वे अपघात, 288 जणांचा मृत्यू

0

बालासोर,दि.4: Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 288 लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी ट्रेनचे अवशेष हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, मालगाडी तीन रेल्वेगाड्यांना झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्यांची संख्या 288 वर पोहोचली असून 1175 हून अधिक जण जखमी झाले आहेत. (Odisha Train Accident)

त्यातील 56 लोक गंभीर जखमी असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ओडिशातील रेल्वे अपघातासाठी कारणीभूत असलेल्या कोणालाही आम्ही सोडणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यांनी अपघातस्थळाची पाहणी केली, तसेच जखमींची विचारपूस केली. (Balasore Train Accident)

https://twitter.com/ANI/status/1665190891261431809?t=wzrlzSe0Gb9nMAE6gmUMlg&s=19

असा झाला रेल्वे अपघात | धडकल्या तीन रेल्वेगाड्या Odisha Train Accident

कोरोमंडल एक्स्प्रेसने रेल्वेमार्गाच्या लूप लाइनमध्ये शुक्रवारी संध्याकाळी 6.50 वा. प्रवेश केला व तिथे उभ्या मालगाडीला जोरदार धडक दिली. कोरोमंडल ताशी 128 किमी वेगाने धावत होती. तिने मालगाडीला जोरदार धडक दिल्याने या गाडीचे डबे रुळावरून घसरले. त्याचवेळी विरुद्ध दिशेने बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस ताशी 116 किमी वेगाने येत होती. ती कोरोमंडल एक्स्प्रेसच्या रुळांवरून घसरलेल्या डब्यांवर धडकली.

https://twitter.com/ANI/status/1665195485706211328?t=QscGh97gkqj6ZYHQFCgoJw&s=19

मानवी चुका, सिग्नलमधील बिघाडामुळे अपघात | Balasore Train Accident

मानवी चुका, सिग्नल यंत्रणेतील त्रुटी तसेच अन्य काही कारणे अपघातामागे असण्याची शक्यता आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी अहवालात म्हटले आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसला मेन लाइनवर येण्यासाठी सिग्नल देण्यात आला होता. मात्र, नंतर तो सिग्नल बंद करण्यात आला. त्यामुळे कोरोमंडल एक्स्प्रेसने लूप लाइनमध्ये प्रवेश करून उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली, असे अहवालात म्हटले आहे. बहानगा बाजार रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर कोरोमंडल एक्स्प्रेसने लूप लाइनमध्ये संध्याकाळी उभ्या मालगाडीला धडक दिली.

रेल्वेकडून 10 लाख मदत

मृतांच्या वारसांना रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाखांची, गंभीर जखमींना दोन लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर झाली. त्याशिवाय पंतप्रधान साहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

इंजिन ड्रायव्हर, गार्ड जखमी

या अपघातात दोन रेल्वेगाड्यांचे इंजिन ड्रायव्हर व गार्ड जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मालगाडीचे इंजिन ड्रायव्हर व गार्ड या जखमी झाले नाहीत. कोरोमंडल एक्स्प्रेसचा लोको पायलट, त्यांचा सहायक तसेच गार्ड व बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा गार्ड या अपघातात जखमी झाला.

अपघातामुळे या मार्गावरील 48 रेल्वेगाड्या रद्द केल्या. 39 रेल्वेगाड्या वळवून दुसऱ्या मार्गाने वळविल्या. चेन्नई-हावडा मेल, दरभंगा-कन्याकुमारी एक्स्प्रेस, कामाख्या-एलटीटी एक्स्प्रेस आदी गाड्या रद्द करण्यात आल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here