जालना,दि.२२: अज्ञात व्यक्तीने ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे (OBC Protestors Navnath Waghmare) यांची गाडी पेटवली आहे. जालना शहरातल्या नीलम नगर भागात नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी काल (21 सप्टेंबर) एका अज्ञात व्यक्तीने पेटविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रात्री साडेदहा ते 11 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीने कारला आग लावल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कॉलनीत ज्या ठिकाणी नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांची गाडी उभी होती त्या ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन आला आणि गाडीवर टाकलेल्या कव्हर वर पहिल्यांदा त्याने कॅन मध्ये असलेले पूर्ण ज्वलनशील पदार्थ चारही बाजूंनी टाकले. आणि त्यानंतर ही आग लावून दिली. (OBC Protestors Navnath Waghmare News)
या आगीने भडका घेताच गाडीवर टाकलेले कव्हर क्षणातच जळून खाक झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस cctv च्या आधारे पुढील तपास करत आहेत. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळउडाली असून राज्यातील सामाजिक वातावरण दिवसागणिकबिगडत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.








