Apple Production In India: Apple चा चीनला झटका, आता टाटा तयार करणार iPhone

0

दि.22: Apple Production In India: Apple कंपनीने चीनला झटका दिला आहे. आता टाटा iPhone तयार करणार आहे. भारतात स्मार्ट फोन मार्केट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगातील दिग्गज टेक कंपन्या चीनमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. स्मार्टफोनसाठी भारत एक प्रमुख बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. अशातच चीनसह इतर देशांचे बिघडते संबंध पाहता केवळ विक्रीसाठीच नव्हे तर उत्पादक म्हणूनही आघाडीच्या स्मार्टफोन कंपनी भारताला प्राधान्य देत आहेत. (Apple Production In India)

अशातच एक मोठी व नामी संधी टाटा समूहाच्या हाती आल्याचे दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार टाटा समूह भारतातील आयफोन निर्माता कंपनी विस्ट्रॉन कॉर्पशी चर्चा करत आहे. टाटा ग्रुप तैवानची कंपनी ताब्यात घेऊन आयफोन उत्पादन भारतात वाढवू इच्छित आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चीनमध्ये अनेक ठिकाणी अद्यापही निर्बंध लागू आहेत. त्यामुळे ॲपलला मोठं नुकसानही सोसावं लागत आहे. याच कारणामुळे ॲपल चीनमधून आपला व्यवसाय हलवण्याच्या तयारीत आहे. भारत हा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय ठरत असल्याचं म्हटलं जात आहे. चीनमधून भारतात दरवर्षी जवळपास 3,70,00 आयफोन शिपमेंट करते. 2022 मध्ये ही 5,70,000 युनिटपर्यंत जाऊ शकते.

2025 पर्यंत 25 टक्के ॲपलच्या प्रोडक्टचं भारतात उत्पादन होईल. जेपी मॉर्गनच्या रिपोर्टनुसार 2025 पर्यंत 25 टक्के आयफोनचं उत्पादनही भारतात सुरू होईल. पुढील तीन वर्षांमध्ये जगभरात विक्री होणारा प्रत्येक चौथा ॲपल प्रोडक्ट मेड इन इंडिया असेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here