बिहारमध्ये भाजपाला मोठा धक्का, नितीश कुमार यांनी भाजपासोबत युती तोडली

0

दि.9: बिहारच्या राजकारणात भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपला धक्का देत राष्ट्रीय जनता दल(RJD) सोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज जनता दल यूनायटेड(JDU)ची बैठक पार पडली, या बैठकीत भाजपसोबतची युती तोडण्यावर निर्णय झाला.

नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपला (BJP) दे धक्का दिल्यानंतर आता बिहारमधील राजकीय समीकरणं बलणार आहेत. थोड्याच वेळात नितीश कुमार राज्यपालांची भट घेणार आहेत. आज नितीश कुमारांच्या घरी खासदार आणि आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे आज सायंकाळी चार वाजता राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेणार आहेत. राज्यपालांच्या भेटीसाठी त्यांनी वेळ मागितली होती. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती तुटल्यानंतर आता बिहारमध्ये जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल यांच्या सहकार्याने नवीन सरकार स्थापन होणार असल्याची माहिती मिळत आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन होणार असल्याची माहिती मिळत आहे. या सरकारला काँग्रेसने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे.

भाजप आणि जदयुची युती तुटल्यानंतर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्विटरवरुन भाजपवर निशाणा साधला. बिहारमध्ये सध्या ऑपरेशन रिव्हर्स लोटस सुरू आहे,अशी टीका त्यांनी केली. याशिवाय, लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्या यांनीदेखील ट्विट करत सत्ता स्थापनेबाबत मोठे संकेत दिले. ‘राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं लालटेनधारी’, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here