Nitin Desai Suicide: सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

0

मुंबई,दि.2: Nitin Desai Suicide: सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या कर्जत येथेली एन. डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. नितीन देसाई यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शनाचं काम केलं. अशा प्रकारे त्यांनी आत्महत्या केल्यामुळे चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ते 58 वर्षांचे होते. (Nitin Desai Suicide)

नितीन देसाई | Nitin Desai

नितीन चंद्रकांत देसाई कलाविश्वातील सर्वात मोठं नाव. 2005 साली हिंदीलाही टक्कर देईल असा आपला एक खाजगी स्टुडिओ त्यांनी कर्जत येथे उभारला. मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटेल असा भव्य ‘एनडी स्टुडिओ’ त्यांनी सुरु केला. याठिकाणी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचं चित्रीकरण झालं आहे. अनेक सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं होतं. ‘परिंदा’, ‘डॉन’, ‘लगान’, ‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘हम दिल दे चुके नम’ अशा अनेक भव्य सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं. तर ‘बालगंधर्व’ सारख्या मराठी सिनेमाचंही कलादिग्दर्शन केले. ‘देवदास’,’खामोशी’ या सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

नितीन देसाई यांची आत्महत्या | Nitin Desai Suicide

1987 सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम सुरू केलं. 2005 साली त्यांनी कर्जतमध्ये त्यांचा एन. डी. स्टुडिओ उभा केला होता. याच स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

नितीन देसाई यांचा जन्म दापोली येथे झाला. त्यांनी मुंबईच्या सर जे. जे. कला महाविद्यालयातून प्रशिक्षण घेतले. तर 1987 पासून त्यांनी कलाविश्वातील कारकिर्दीला सुरुवात केली. 1993 साली आलेल्या अधिकारी ब्रदर्सच्या ‘भूकंप’ सिनेमातून त्यांनी सुरुवात केली. मात्र 1994 साली आलेल्या ‘1942 अ लव्ह स्टोरी’ या सिनेमामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. आज 2 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याने हा कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here