Nitesh Rane: खेल आपने शुरू किया है, खतम हम करेंगें, न्याय मिलेगा!: नितेश राणे

0

मुंबई,दि.5: Nitesh Rane: भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी ट्विट करत राज्य सरकारला इशारा दिला आहे. “खेल आपने शुरू किया है, खतम हम करेंगें. न्याय मिलेगा!,” असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल झालेले भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे सुपूत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांचा आता पोलिसांकडून जबाब नोंदवला जाणार आहे.

नारायण राणे आणि नितेश राणे हे शनिवारी मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात हजर राहणार आहेत. त्यापूर्वी नितेश राणे यांनी एक सूचक ट्विट केले आहे. खेल आपने शुरू किया है, खतम हम करेंगें. न्याय मिलेगा!, असे नितेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमधून नितेश राणे यांना ठाकरे सरकारला एकप्रकारे इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु, आता मालवणी पोलीस ठाण्यात राणे पिता-पुत्रांचा जबाब नोंदवल्यानंतर राज्य सरकार पुढे काय पावले उचलणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

10 मार्चपर्यंत दिशा सालियन प्रकरणात नारायण राणे आणि नितेश राणे यांना अटकेपासून संरक्षण आहे. त्यामुळे आज जबाब नोंदवल्यानंतरही राणे पिता-पुत्रांना अटकेची भीती नाही. राणे पितापुत्रांनी दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांना लेखी उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणाची पुढील सुनावणी 10 मार्चला होणार आहे. तोपर्यंत नारायण राणे आणि नितेश राणे यांना अटक होणार नसल्याची हमी विशेष सरकारी वकिलांनी दिली.

नारायण राणे व नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल

निराधार आरोप करून दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी महिला आयोगाकडून नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दिशा सालियन हिच्यावर बलात्कार झाला. तिच्यावर बलात्कार होताना एका मंत्र्याचे सुरक्षारक्षक फ्लॅटबाहेर होते, असा दावाही नारायण राणे यांनी अलीकडेच झालेल्या पत्रकारपरिषदेत केला होता. त्यानंतर नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांनीही अशाचप्रकारच्या आरोपांची राळ उडवून दिली होती. यानंतर दिशाच्या आई-वडिलांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती. नारायण राणे आणि नितेश राणे आपल्या मुलीची मृत्यूनंतरही बदनामी करत असल्याचे दिशाच्या पालकांनी म्हटले होते. याचीच दखल घेत महिला आयोगाच्या तक्रारीनंतर राणे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here