Nitesh Rane: संतोष परब हल्लाप्रकरण भाजपा आमदार नितेश राणेंनी घेतला हा निर्णय

0

सिंधुदुर्ग, दि.२: संतोष परब हल्लाप्रकरणात भारतीय जनता पार्टीचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने मंगळवारी यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला होता. भाजप आमदार नितेश राणे बुधवारी न्यायालयासमोर आत्मसमर्पण करणार आहेत. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने मंगळवारी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, हा अर्जही नितेश राणे यांच्याकडून मागे घेण्यात आला आहे. आता ते कणकवली फौजदारी न्यायालयासमोर आत्मसमर्पण करणार आहेत. यावर आता सरकारी पक्षाकडून काय पावलं उचलली जाणार, हे पाहावे लागले.

उच्च न्यायालयातही (High Court) नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळाला जाण्याची दाट शक्यता होती. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या ओम गणेश बंगल्यावर सकाळपासून वकिलांची खलबंत सुरु होती. या बैठकीत नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई आणि कायदेतज्ज्ञ उमेश सांवत हजर होते. तर सतीश मानशिंदे आणि इतर वकील मुंबईतून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीअंती नितेश राणे यांनी न्यायालयासमोर शरणागती पत्कारावी, असा निष्कर्ष निघाला. जेणेकरुन त्यांना जामीन मिळण्याची वाट सुकर होईल, असे वकिलांचे म्हणणे आहे. त्यानुसार नितेश राणे थोड्यावेळात त्यांच्या ओम गणेश बंगल्यावरुन कणकवली न्यायालयात जाणार आहे.

नितेश राणे यांची कणकवली पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची तयारी असून ते तपासात सहकार्य करणार आहेत. त्यामुळे जामीन अर्ज मागे घेऊ द्यावा, अशी विनंती नितेश यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग यांना केली. न्यायमूर्ती भडंग यांनी ती विनंती मान्य करत अर्ज मागे घेऊ दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here