Nitesh Rane, Nilesh Rane: शरद पवार यांच्यावर टीका, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल

0

मुंबई,दि.१३: Nitesh Rane, Nilesh Rane: भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यावर मरिनड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भाजपाचे निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. मराठा समाजाच्या अनिल देशमुखांचा (Anil Deshmukh) राजीनामा लगेच घेतला, मग नवाब मलिक यांचा राजीनामा अद्याप का घेतला नाही. नवाब मलिक शरद पवारांचे कोण आहेत?, मला कधी कधी संशय येतो की शरद पवार हेच दाऊदचा माणूस आहेत, असा गंभीर आरोपही निलेश राणेंनी केला होता.

तर नितेश राणे (Nitesh Rane) यांची आझाद मैदानातील मोर्चादरम्यान शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांची जीभ घसरली होती. याच कारणावरून नितेश आणि निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. याप्रकरणात आता पोलीस या दोघांनाही चौकशीसाठी बोलावणार किंवा पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

निलेश राणे काय म्हणाले?

निलेश राणे यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्यावर टीका केली होती. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणारे शरद पवार नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत. काही वेगळे राजकारण आहे का? शरद पवारच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस असल्याचा संशय मला वाटतो, असं खळबळजनक वक्तव्य निलेश राणेंनी केलं होतं. ज्याने बॉम्बस्फोटातील आरोपींना पैसे दिले. दाऊदशी आर्थिक व्यवहार केले, त्या नवाब मलिक यांना पाठीशी घालतात आणि अनिल देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घेता, मग नवाब मलिक यांच्याशी तुमचे संबंध काय? कोण लागतो नवाब मलिक शरद पवारांचा? नवाब मलिक पवार कुटुंबीयांसाठी काही खास आहेत का? की नवाब मलिक खरे बोलले तर, पवार यांच्याबद्दल माहिती उघड होईल, अशी त्यांना भीती आहे? असा मला संशय वाटतो, असे राणे म्हणाले होते. नवाब मलिकांचा राजीनामा का घेतला जात नाही, हे पवारच सांगतील, असंही ते म्हणाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here