नाशिक,दि.7: भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हिंदूच्या देवांची अशा प्रकारे विटंबना केली जात आहे, उद्धव ठाकरे म्हणजेच बाळासाहेबांचा मुलगा हे कस सहन करू शकतो असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. तसेच शरद पवारांवर कविता लिहिली तिला आत टाकली, मग हे का सापडत नाही, हिंदू संघटनांनी संयम सोडला तर बोलू नका, संबंधितांवर कारवाई झाली नाही तर आमचा संयम सुटेल या कडक शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
काश्मिरी पंडितांसाठी मोदी, शाह आहेत, तुम्ही इथलं सांभाळा अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. सोशल मीडियावर शिवलिंगाची विटंबना केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता उद्धव ठाकरेंना सुनावलं.
नाशिकमध्ये नितेश राणे पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार टीका केली. यावेळी ते बोलत होते. राज्यभरात हिंदूच्या देवांची अशा प्रकारे विटंबना केली जात आहे. याला आवर घालणे आवश्यक आहे. मात्र यावर काहीच कारवाई होत नाही. बाळासाहेबांचा मुलगा हे कस सहन करू शकतो. हिंदू देवदेवतांची विटंबना करण्याची, सोशल मीडियावर पोस्ट करण्याची या लोकांना अशा प्रकारे पोस्ट करण्याची सूट दिलीय का? या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा या नंतर जर कायदा सूव्यवस्था बिघडली तर आम्ही जबाबदार राहणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान याच संदर्भात बोलतांना नितेश राणे म्हणाले कि, पवारांवर कविता लिहिली तिला आत टाकली मग हे गुन्हेगार का सापडत नाही. या प्रकरणी पोलिसांना सगळी माहिती दिली आहे. पोलिसांनी खरी मर्दानगी आता दाखवावी. नाशिक मध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. मागील 20 दिवसांत आठ हत्या झाल्या आहेत. त्यामुळे सिंघम सारखं सगळीकडे कारवाईसाठी जाणारे नाशिक पोलीस आता काय करत आहे? असा सवाल त्यांनी नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केला.
संजय पवार कडवट शिवसैनिक
शिवसेनेवर टीका करताना त्यांनी राज्यसभेचे उमेदवार शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय पवार यांचे कोडकौतुक केले. शिवसेनेचा कट्टर समर्थक हा संजय पवार असून संजय राऊत नाही. संजय राऊत बाहेरून आला आहे. संजय राऊत निर्लज्ज असून त्याने मासाहेब आणि बाळासाहेब यांच्यात वाद असल्याचा लेख लिहिला होता. अशा संजय राऊतला शिवसेनेचे आमदार मत देतीला का? उलट सेफ मत संजय पवार याला द्यावी, राऊतला उर्वरित मत द्यावी. संजय राऊत ला लीलावतीला पाठविण्याची वेळ आली आहे. असे सूचक विधान देखील नितेश राणे यावेळी केले.
“पावसाळी अधिवेशनात ठाकरे सरकारला जाब विचारणार आहे. मीच कसा हिंदू आहे हे सांगण्यासाठी मुख्यमंत्री उद्या येणार आहेत. पण त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची इतकी भीती वाटते की सकाळचं औषधही मुख्यमंत्री त्यांना विचारल्याशिवाय घेत नाहीत,” असा टोला नितेश राणे यांनी यावेळी लगावला.