Nitesh Rane: न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, शिवसैनिकांचा जल्लोष

0

मुंबई,दि.30: Nitesh Rane: नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या जामीन अर्जावर गेल्या तीन दिवसांपासून सुनावणी सुरू होती, मात्र आज तिसऱ्या दिवशी नितेश राणे यांना न्यायलायाने मोठा झटका दिला आहे. नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. शिवसैनीकांनी नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यानंतर फटाके फोडले आहेत.

शिवसैनिकांचा जल्लोष

कणकवलीत शिवसैनिकांनी नितेश राणे यांचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर जल्लोष साजरा केला आहे. शिवसैनिकांनी फटाके फोडण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पुन्हा भाजप आणि शिवसैनिक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. कोकणात शिवसैनिक विरुद्ध राणे संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे.

हायकोर्टात जाणार

जिल्हा सत्र न्यायलयाने जामीन नाकारल्यानंतर आता नितेश राणे हायकोर्टात धाव घेणार आहेत, हायकोर्टात आम्हाला जरूर न्याय मिळेल अशा प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून देण्यात येत आहेत. जामीन नाकरल्यामुळे नितेश राणेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कोर्टाने नितेश राणे यांचा मोबाइल जप्त करून कस्टडी मागितली आहे. मात्र, आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. तिथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करणार आहोत. तिथे सुनावणी होईपर्यंत आम्हाला बाजूला राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नितेश राणे काही शरण वगैरे येणार नाहीत. मात्र, पोलिसांना तपासात आजपर्यंत सहकार्य केले आहे आणि मदत मागितली तरी ती करू, असे ते म्हणाले. अशी माहिती राणेंच्या वकिलांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here