Nitesh Rane: हरवला आहे डोळे नेपाळ्या सारखे डोक्याने मंद माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस

0

मुंबई,दि.31: Nitesh Rane: मुंबईत राणे समर्थकांचे बॅनर्स झळकले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ ते बॅनर खाली उतरवले होते. मुंबईच्या दादर परिसरात संकेत बावकर या राणे समर्थकाकडून बॅनर्स लावण्यात आले होते. 100 कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाही. वाघ हा वाघच असतो, असा मजकूर या बॅनर्सवर लिहला होता.

शिवसैनिक हल्लाप्रकरणी आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) व संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी तिसऱ्या दिवशी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी फेटाळून लावला आहे. यात राणे यांचा मोबाईल हस्तगत करणे आवश्यक असल्याचे कारण देत न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत. आता यावरून मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे. 

मुंबईतील चर्चगेट या स्थानकाबाहेर नितेश राणे यांच्या फोटोसह एक बॅनर लावण्यात आला आहे. तसंच यात नितेश राणे हरवले असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस म्हणून देण्यात येईल, असंही बॅनरवर नमूद करण्यात आलंय. दरम्यान, हे बॅनर कोणी लावले याबद्दल मात्र कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here