मुंबई,दि.1: Nita Ambani Dance Video: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) व नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या कुटुंबाची नेहमी चर्चा सुरू असते. ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’चा (Nita Mukesh Ambani Cultural Center) उद्धाटन सोहळा नुकताच मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पार पडला. या सोहळ्यादरम्यान सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. उद्धाटन सोहळ्यातील सेलिब्रिटींचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. पण त्याबरोबरच एक व्हिडीओने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या उद्धाटनादरम्यान नीता अंबानी यांनी भरतनाट्य सादर केलं.
‘रघुपती राघव राजा राम’ या गाण्यावर नीता अंबानी यांनी केले नृत्य | Nita Ambani Dance Video
मात्र या सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरला नीता अंबानी यांचा सुंदर डान्स परफॉर्मन्स. ‘रघुपती राघव राजा राम’ या गाण्यावर नीता अंबानी यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर केले. या डान्स परफॉर्मन्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून त्याला खूप लाइक्स मिळाले आहेत. नीता अंबानी यांनी मंत्रमुग्ध करणारे नृत्य सादर केले.
‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या उद्धाटनादरम्यान नीता अंबानी यांनी आपल्या नृत्याने उपस्थित असलेल्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नृत्य सादर करताना नीता अंबानी यांनी खास लूक केला होता. लाल रंगाचा लेहेंगा आणि त्यावर आकर्षक दागिने असा नीता अंबानी यांचा लुक होता.
वयाच्या सहाव्या वर्षी भरतनाट्यमला सुरुवात | Nita Ambani
नीता अंबानी यांनी वयाच्या सहाव्या वर्षी भरतनाट्यमला सुरुवात केली आहे. एनएमएसीसीने शेअर केलेल्या व्हिडीओवर,”वयाच्या सहाव्या वर्षी भरतनाट्यमला सुरुवात करणाऱ्या नीता अंबानी आज एक उत्कृष्ट नृत्यांगणा आहेत. नीता अंबानी यांनी आता बीकेसीमधील जिओ सेंटरमध्ये झालेल्या ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या उद्धाटनादरम्यान नृत्य सादर केलं आहे.
‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ हे मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ सेंटरमध्ये बनवण्यात आलं आहे. हे देशातलं सर्वात मोठं कलाकेंद्र असल्याचं म्हटलं जात आहे. या कल्चरल सेंटरच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जोपासली जाणार आहे. देशभरातील विविध कलेचे प्रकार या मंचावर सादर होणार आहेत. यात नृत्य, अभिनय, संगीत, साहित्य अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.