Muslims in India | भारतातील मुस्लिमांची स्थिती पाकिस्तानच्या तुलनेत खूपच चांगली: निर्मला सीतारमन

0

वॉशिंगटन,दि.11: Muslims in India: भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी अमेरिकेतील पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स (PIIE) येथे एका कार्यक्रमादरम्यान भारताबाबत पाश्चात्य देशांचे असलेल्या मताबद्दल फटकारले. येथे सीतारामन यांनी भारताबाबतच्या नकारात्मक मताबद्दल पाश्चात्य देशाला समर्पक उत्तर दिले आहेत. सीतारामन यांनी सांगितले की, भारतातील मुस्लिमांची स्थिती पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या मुस्लिमांपेक्षा खूपच चांगली आहे. सीतारमन रविवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दाखल झाल्या आहेत. (Nirmala Sitharaman On Muslims In India)

गैरसमजांवर विश्वास ठेवू नका | Nirmala Sitharaman

निर्मला सीतारमन यांना भारतातील गुंतवणूक किंवा भांडवली प्रवाहावर परिणाम करणाऱ्या धारणांशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या, ‘मला वाटते की भारतात येणार्‍या गुंतवणूकदारांकडे उत्तर आहे. हे असे गुंतवणूकदार आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून भारतात येत आहेत. ज्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यात रस आहे, त्यांना मी एवढेच सांगेन की, भारतात काय चालले आहे ते पहा आणि काही लोकांच्या गैरसमजांवर विश्वास ठेवू नका ज्यांना ग्राउंड रिअ‍ॅलिटीची माहिती नाही आणि फक्त अहवाल तयार करा.

फाळणीचे सत्य सांगितले | Nirmala Sitharaman On Muslims in India

PIIE चे अध्यक्ष ॲडम एस. पोसेन यांनी सीतारामन यांना पाश्चात्य मीडियामध्ये विरोधी खासदारांनी त्यांची पदे गमावल्याबद्दल आणि भारतातील मुस्लिम अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराबद्दलच्या व्यापक वृत्तांबद्दल विचारले. यावर अर्थमंत्र्यांनी उत्तर दिले, ‘भारत हा जगातील असा देश आहे जिथे मुस्लिमांची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ती वाढतच आहे.

जर काही समज असेल किंवा त्यात काही वास्तव असेल किंवा राज्यांच्या पाठिंब्याने भारतातील मुस्लिमांचे जगणे कठीण झाले आहे असे वाटत असेल तर 1947 च्या तुलनेत मुस्लिम लोकसंख्या वाढली असती का?’ त्यानंतर सीतारमन यांनी फाळणीचा उल्लेख केला. फाळणीच्या वेळीचा भारत आणि पाकिस्तान या नव्याने निर्माण झालेला देश यांची त्यांनी तुलना केली.

भारत आणि पाकिस्तानमधील मुस्लिम | Muslims in India

सीतारमन म्हणाल्या की अल्पसंख्याकांच्या संख्येत घट झाली असेल तर ती पाकिस्तान आहे. ज्या पाकिस्तानने स्वतःला इस्लामिक देश म्हणून घोषित केले आणि अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले, तेथे आज प्रत्येक अल्पसंख्याक समुदायाची संख्या कमी होत चालली आहे.ते म्हणाले की, काही मुस्लीम पंथही नष्ट झाले आहेत. सीतारामन म्हणाल्या, “मुहाजिर, शिया आणि तुम्ही नाव देऊ शकता अशा प्रत्येक गटाच्या विरोधात हिंसाचार होत आहे. हे असे मुस्लिम समुदाय आहेत ज्यांना मुख्य प्रवाहात स्वीकारले जात नाही. भारतात असताना तुम्हाला दिसेल की प्रत्येक वर्गातील मुस्लिम आपापले व्यवसाय करत आहेत, त्यांची मुले शिक्षण घेत आहेत. काही समाजातील मुलांना सरकारकडून फेलोशिप दिली जात असल्याची माहिती सीतारमन यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here