Nilesh Rane: मराठा समाजाच्या अनिल देशमुखांचा राजीनामा लगेच,शरद पवार हेच दाऊदचा माणूस? निलेश राणे

0

मुंबई,दि.१२: भाजपाचे निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबई अंडरवर्ल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक करत कारवाई केली. नवाब मलिक सध्या ईडी कोठडीत आहेत. राज्य सरकारने नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नाही.

नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक झाल्यापासून भाजप आक्रमक झाली असून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. आता, भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनीही मलिकांच्या राजीनाम्यावर थेट शरद पवारांनाच प्रश्न विचारले आहेत. 

नवाब मलिक(Nawab Malik) आणि दहशतवाद्यांचा जो जमीन व्यवहार झाला त्यामागे सूत्रधार दाऊदची बहीण हसीना पारकर ही होती. या पैशाचा वापर मुंबईत ३ बॉम्बस्फोट घडवण्यासाठी झाला. काळ्या पैशातून जमीन खरेदी करून टेरर फंडिंग केले गेले. या टेरर फंडिंगमध्ये महाराष्ट्रातला मंत्री मदत करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्हाला एकदिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यावं लागेल. कुणाच्या दाढ्या कुरवाळताय? तुम्ही मलिकांचा राजीनामा घेतला नाही, तरी आमचा संघर्ष सुरूच राहील असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनावेळी दिला. मलिक यांच्या राजीनाम्यासाठी फडणवीस यांच्यासह संपूर्ण भाजप आक्रमक झाली आहे. आता, निलेश राणेंनीही मलिकांचा राजीनामा मागितला आहे. 

मराठा समाजाच्या अनिल देशमुखांचा (Anil Deshmukh) राजीनामा लगेच घेतला, मग नवाब मलिक यांचा राजीनामा अद्याप का घेतला नाही. दाऊदसारख्या देशाचा दुश्मन असलेल्या व्यक्तीच्या माणसांशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मलिकांना राजीनामा घेतला पाहिजे, असे निलेश राणे यांनी म्हटले. तसेच नवाब मलिक शरद पवारांचे कोण आहेत?, मला कधी कधी संशय येतो की शरद पवार हेच दाऊदचा माणूस आहेत, असा गंभीर आरोपही निलेश राणेंनी केला आहे. 

सुप्रिया सुळेंनी मलिक यांची प्रकृती पाहण्यासाठी भेटायचं म्हणत तत्परता दाखवली. ती तत्परता, काळजी अनिल देशमुखांवेळी कोठे होती, असा प्रश्नही निलेश यांनी केला. नवाब मलिक हे पवार कुटुंबीयांसाठी काही स्पेशल आहेत का, नवाब मलिक शरद पवारांबद्दल काही बोलेन, अशी भिती तर नाही ना?, अशी संशयांस्पद शंकाही निलेश राणेंनी विचारली आहे. दरम्यान, ईडीची कारवाई आणि विशेष न्यायालयाने दिलेल्या कोठडीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या नवाब मलिक यांच्या हेबिअस कॉर्पस याचिकेवर शुक्रवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यानंतर, न्या. पी.बी. वराळे व न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवला. मंगळवारी निर्णय देऊ, असे खंडपीठाने स्पष्ट केले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here