Omicron व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी नवीन नियमावली

0

Omicron Variant : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा नवीन व्हेरिएंट (omicron) आढळल्याने अनेक देशात खळबळ माजली आहे. भारतातही ओमिक्रॉन (Omicron) रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रातही (Maharashtra) रुग्णांची संख्या वाढत आहे. डोंबिवली, पुणे आणि मुंबईमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटबाधित रुग्णांची संख्या 10 झाली आहे. ओमायक्रॉन रुग्णाची वाढती संख्या पाहाता आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी राज्य सरकारने प्रवाशांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारकडून दक्षिण आफ्रिकासह 11 देशांना हाय रिस्कमध्ये ठेवलं आहे. या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी कठोर नियमावली जारी करण्यात आली आहे.

ही आहे नियमावली

30 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या नियमांवलीमध्ये राज्य सरकारने सुधारणा केली आहे. 30 नोव्हेंबर रोजी दोन देशांना हाय रिस्कमध्ये ठेवण्यात आलं होतं. याची संख्या आता 11 करण्यात आली आहे.

सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जर या चाचणीमध्ये ओमायक्रॉनची बाधा झाल्याचा रिपोर्ट आला तर सक्तीचं क्वारंटनाई करण्यात आलं आहे. तसेच संबधित नियमांनुसार उपचार घ्यावे लागतील. निगेटिव्ह येईपर्यंत सर्व नियमांनुसार उपचार घ्यावे लागतील.

प्रवाशाची चाचणी निगेटिव्ह आली तर सात दिवसांचं होम विलगीकरण करण्यात येईल. त्यानंतर आठव्या दिवशी पुन्हा चाचणी कऱण्यात येईल. जर निगेटिव्ह रिपोर्ट आला तर पुढील सात दिवस होम क्वारटाईन व्हावं लागेलं.

हाय रिस्क देशाची यादी –

  1. युरोप आणि युके
  2. दक्षिण आफ्रिका
  3. ब्राझिल
  4. बोत्सवाना
  5. मॉरिशिअस
  6. न्यूझीलंड
  7. सिंगापूर
  8. हाँगकाँग
  9. झिम्बॉबे
  10. इस्राइल
  11. चीन


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here