सोलापूर,दि.१९: नेहरू युवा केंद्राच्या सोलापूर येथील कार्यालयात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्यानंतर भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे आणि भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य यतिराज होनमाने यांनी कार्यालयाची तपासणी केली असता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली.
पहिल्यांदा शिपाई सुभाष चव्हाण हे कार्यालय उघडण्यासाठी टाळाटाळ करत होते, त्यानंतर भाजपा सोलापूर जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे आणि भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य यतिराज होनमाने यांनी आग्रह केल्यानंतर कार्यालय उघडून पाहणी केली तर चक्क सभागृहात नंबर १ दारूची मोठी बॉटल, दारूचे काचेचे ग्लास आढळून आले.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा: विकास वाघमारे
नेहरू युवा केंद्र हे समाजातील युवकांसाठी काम करणारी संस्था एह, या ठिकाणी दारू पित बसणे हे गंभीर आहे, केवळ एवढेच नाही तर सुभाष चव्हाण हे दररोज हे कार्यालयातच आणि कार्यालयाच्या वेळेत दारू पीत असल्याचा खुलासा जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार यांनी केला आहे, या दोन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ केले पाहिजे, तसेच त्यांची कठोर चौकशी केली पाहिजे अशी मागणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे करणार आहे, त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्याची आमची मागणी आहे. या अधिकाऱ्यांना घराकडे पाठवल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे विकास वाघमारे म्हणाले.