शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना शरद पवारांनी दिला इशारा; उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठींबा

0

मुंबई, दि.23: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे. बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल. हे सरकार टीकावे यासाठी सगळे प्रसत्न आपण करू, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये जो काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) राष्ट्रवादीचा पूर्णपणे पाठींबा असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.\

राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीला 2 आमदार वगळता सगळे आमदार, खासदार उपस्थित होते. काही व्हीसीवरुन तर काही प्रत्यक्ष हजर होते. महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरेंना आमचा खंबीर पाठिंबा आहे. शेवटपर्यंत संघर्ष करत राहू, सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करणार, मी दुपारीही मुख्यमंत्र्यांशी बोललो. आताही बोललो. यापेक्षा दुसरी कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. ही आमची अधिकृत भूमिका असेल. प्रसारमाध्यमांनी इतर कोणत्याही वृत्तवर विश्वास ठेवू नये. शिवसेनेबाबत जे काही निर्माण झालं आहे ते त्यांचे प्रवक्ते सांगतील.. सेनेचे काही आमदार परत आले आहेत.. त्यांनी आपली आपबिती सांगितली आहे, असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, शिवसेनेत जे काही प्रश्न निर्माण झालेत त्याबद्दल शिवसेनेचे नेते, प्रवक्ते अधिकृतपणे बोलतील. काही आमदार परत आलेत. नितीन देशमुख, कैलास पाटील यांनी तिथे काय घडलं हे सांगितले. गुवाहाटीत जे आमदार आहेत त्यांना आवाहन करण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे. आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. पक्षाची भूमिका महाविकास आघाडी सरकार टिकवण्याची आहे. सर्व आमदार आमच्यासोबत आहोत असं सांगितले. 

तसेच मित्रपक्ष वेगळ्या प्रकारे विधान करत आहेत. सरकार अडीच वर्षापूर्वी अस्तित्वात आले. 36 पालकमंत्री नेमले, प्रत्येकाला समसमान वाटप केले. निधीमध्ये कुठेही कपात केली नाही. निधी वाटप सगळ्यांना झाले. मी कधीही दुजाभाव केला नाही. मी सगळ्यांना विकासकामात मदत करण्याची भूमिका माझी असते. मी सकाळी कामाला सुरूवात करून बैठका घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. मविआच्या बैठकीत काही तक्रारी केल्या असत्या तर समज-गैरसमज दूर झाले असते. सध्या महाविकास आघाडी कशी टिकेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं प्रत्युत्तर अजित पवारांनी नाना पटोलेंना दिले आहे.

170 आमदारांच्या पाठिंब्यावर हे सरकार आलं होतं. पवार साहेबांनी पुढाकार घेतला, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस असे सर्व एकत्र येऊन हे सरकार अस्तित्वात आलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी खासदार, आमदारांची बैठक घेतली. राजकीय परिस्थिती निर्माण झालीय त्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याचा निर्णय झालाय. तसेच काम सुरुच ठेवण्याचे आदेश त्यांनी दिलाय. परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. याशिवाय दुसरी कोणतीच भूमिका आमची नाही, मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभे राहणार आहोत. शिवसेनेचा वेगळी भूमिका असू शकते. काही आमदार परतत आहेत, तेथील आमदारांना मुख्यमंत्री यांनी आवाहन केलंय.

एकनाथ शिंदे यांच्या मागे असणारा राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजपच आहे, अजित पवारांना त्याची जास्त माहिती नसेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. सरकार टिकणार की नाही हे विधानसभेतील बहुमत ठरवेल आणि महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बंडखोर आमदारांना त्यांचे बहुमत सिद्ध करण्यासाठी इकडे यावेच लागेल असही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी हे वक्तव्य केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here