NCP On Nawab Malik: नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीने घेतला हा निर्णय

0

मुंबई,दि.23: NCP On Nawab Malik: महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.

राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची अटक चुकीची असल्याचं सांगत राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या मागे ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायचा नाही असं पक्षाच्या बैठकीत ठरलं आहे. तसेच महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनीही राष्ट्रवादीच्या या भूमिकेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. त्यावर आता राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट झाली आहे.

तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मनी लॉंड्रिंगच्या प्रकरणात राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. ईडीच्या अटकेनंतर नवाब मलिक यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली होती.

अंडरवर्ल्डशी संबंध ठेवणे, त्याच्याशी संबंधित पैशाचा वापर करणे, हा पैसा परदेशात पाठवणाऱ्या कंपनीशी संबंध असणे या आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here