राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी नालसाब मुल्ला यांचा गोळीबार करुन खून

0

सांगली,दि.१८: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी नालसाब मुल्ला यांचा गोळीबार करुन खून करण्यात आला आहे. सांगलीतील गुंड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी नालसाब मुल्ला याचा गँगवॉरमधून गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. शनिवारी (दि.१७) सायंकाळी झालेल्या या हल्ल्यात मुल्ला गंभीर जखमी झाला आहे. या गोळीबारानंतर सांगली परिसरात मोठी खळबळ माजली.

मुल्ला यांचा बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय असून सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बुलेटवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारचा आवाज ऐकून मुल्ला यांचे कुटुंबिय तात्काळ धावले‌. गंभीर स्थिती जिल्हा सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरु होण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकारानंतर कार्यकर्त्यांनी रुग्णालय व गुलाब कॉलनीत गर्दी केली. पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांच्यासह विश्रामबाग पोलीस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

कोण आहे नालसाब मुल्ला?

नालसाब हा सांगलीतील नामचीन गुंड होता. त्याच्यावर खून, सावकारी इत्यादी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्याला मोका देखील लावण्यात आला होता. सन 2005 साली तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी त्याच्या घरावर छापा टाकून सहा तलवारी आणि पाच लाखाची रोकड जप्त केली होती. नालसाब मुल्ला हा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here