राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे पोलिंग एजंट: राष्ट्रवादीच्या २० आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क

0

मुंबई,दि.१०: राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला (Rajya Sabha Election Voting) आता सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या आतापर्यंत २० आमदारांनी मतदान केल्याची माहिती समोर येत आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी सर्वात आधी मतदानाचा हक्क बजावला. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी देखील मतदान केलं आहे. 

सर्वांत पहिले राष्ट्रवादीचे सर्व आमदार मतदान करणार, त्यानंतर शिवसेनेचे सर्व आमदार मतदानाची भूमिका बजावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडून खासदार सुनिल तटकरे आणि मंत्री जयंत पाटील, शिवसेनेकडून सुनिल प्रभू आणि काँग्रेसकडून मंत्री अशोक चव्हाण पोलिंग एजंट असल्याची माहिती समोर आली आहे.

आपल्या कोणत्याही आमदाराचे मत बाद ठरू नये म्हणून प्रत्येक पक्ष डोळ्यात तेल घालून खबरदारी घेत आहे. कशा पद्धतीने मतदान करायचे, दुसऱ्या पसंतीची मते देताना काय काळजी घ्यायची, हे आमदारांना समजावून सांगत मतदानाची रंगीत तालीम घेण्यात आली. भाजपकडून आमदारांची पळवापळवी होऊ शकते हे गृहीत धरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी फिल्डिंग लावली आहे. 

आज सकाळीच एमआयएमच्या महाराष्ट्रातील दोन्ही आमदारांना कॉंग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगितले असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here