Rohit Pawar: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

0

मुंबई,दि.27: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 2006 ते 2012 पर्यंत रोहित पवार हे या कंपनीचे संचालक होते. रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीच्या प्राथमिक चौकशीला ईडीकडून (ED) सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 2006 ते 2012 पर्यंत रोहित पवार (Rohit Pawar) हे या कंपनीचे संचालक होते. तसेच रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार (Rajendra Pawar) हे देखील 2006 ते 2009 पर्यंत या ग्रीन एकर कंपनीचे संचालक होते. त्याचबरोबर या कंपनीत असणारे इतर सर्व सदस्य हे सध्या तुरुंगात असलेल्या एचडीआयएल कंपनीचे मालक राकेश वाधवान (Rakesh wadhwan) यांच्यासोबत इतर कंपन्यांमध्ये पार्टनर देखील आहेत आणि याचदृष्टीनं ईडीचा तपास सुरु आहे.

यामध्ये बाबासाहेब सुर्यवंशी, लखमिंदर सिंग, धोंडू जडयार अरविंद पाटील यांच्या नावांचा सामावेश आहे. शिवाय ज्यावेळी रोहित पवार ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून बाहेर पडले त्यानंतर हळूहळू इतर चार सदस्य देखील त्या कंपनीतून बाहेर पडले. त्यामुळें आता ईडीने या संपूर्ण प्रकरणात रोहीत पवार यांचे राखेश वाधवान यांच्या सोबतचे संबंध पाहता प्राथमिक तपासला सुरुवात केली आहे. ईडी आपल्या तपासात या कंपनीचा फॉरेन्सिक ऑडिट, शेअर धारक आणि संचालक यांची अर्थिक देवाण घेवाण याची बारकाईने तपास करणार आहे. ईडीला यात मनी लॉन्डरिंग तर झालं नाही ना याचा तपास करायचा आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here