Praful Patel : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सलमान खान आणि शिल्पा शेट्टीबरोबर केला डान्स

0

Praful Patel : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि शिल्पा शेट्टीबरोबर (Shilpa Shetty) डान्स केला. प्रफुल्ल पटेल यांचा मुलगा प्रजय यांचा विवाहसोहळा नुकतंच पार पडला. या लग्नानिमित्त जयपूरमधील रामबाग पॅलेसमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उद्योगपती अनिल अंबानी, गौतम अदानी यांच्यासह इतर उद्योगपतींनी हजेरी लावली. त्यासोबतच बॉलिवूड अभिनेता सलमान खान, शिल्पा शेट्टी यांसह चित्रपट क्षेत्रातील अनेक अभिनेते आणि राजकीय नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रुफल पटेल हे सलमान खान, शिल्पा शेट्टीसोबत डान्स करताना पाहायला मिळाले. (NCP leader Praful Patel dances with Salman Khan and Shilpa Shetty)

याबाबतचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यात सलमान खान, शिल्पा शेट्टी एकत्र नाचत असल्याचे दिसत आहे. तसेच अनिल कपूर या लग्नाच्या कार्यक्रमात नाचताना दिसत आहे. सलमान खानच्या झुम्मे की रात हे या गाण्यावर नाचत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनिल कपूरही डान्स करत असताना सलमान खानला चीअर करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान सलमान खान लवकरच कतरिना कैफसोबत आगामी ‘टायगर ३’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सलमान आणि कतरिना दिल्लीत १५ दिवस दिवस चित्रपटाचे शूटिंग करणार आहेत. यानंतर ‘टायगर 3’चे शूटिंग पूर्ण होणार असल्याचे बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी सलमानचा ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

सलमान खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. सलमानने माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावली. या लग्नसभारंभात नाचताना एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here