राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे समीर वानखेडे यांचा फोटो केला शेअर

0

मुंबई,दि.22: राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आतापर्यंत एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मुंबई क्रूझ ड्रग पार्टीवर (Mumbai Cruise drug party) केलेली कारवाई बोगस होती असा दावा मलिक यांनी यापूर्वीच केला होता. तसेच समीर वानखेडे हे मुस्लिम (Muslim) असल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांनी फसवणूक करून नोकरी मिळविल्याचा दावा मलिक यांनी केला होता.

समीर वानखेडे हे मुस्लिम (Muslim) असल्याचा आरोप नवाब मलिक सातत्याने करत आहेत. त्यासदर्भातील काही पुरावे देखील त्यांनी सादर केले होते. मात्र आता पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्या फोटोमध्ये समीर वानखेडे हे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत.

हेही वाचा ॲड. प्रकाश आंबेडकरांचे समीर वानखेडे यांच्या धर्माबद्दल मोठं वक्तव्य

नवाब मलिक यांनी हा फोटो पोस्ट करताना ‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’ कबूल है, कबूल है, कबूल है… असे कॅप्शन देखील दिले आहे. समीर वानखेडे हे हिंदू नसून मुस्लिमच असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यांनी याबाबत अनेकदा पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे देखील सादर केले आहेत. आज पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर ‘फोटोबॉम्ब’ फोडला आहे. त्यांनी वानखेडे यांचा ट्वटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत. या फोटोमुळे वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here