Nawab Malik: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केले पुन्हा गंभीर आरोप

0

मुंबई,दि.18: राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीचे समीर वानखेडे यांनी पहिल्या पत्नीच्या मामेभावाला व IPS अधिकाऱ्याच्या मुलाला अडकवण्याचं काम केले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा मलिक यांनी केला. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मानहानीचा दावा केला असून आज त्यावर न्यायालयात सुनावणी होईल असे मलिक यांनी सांगितले. समीर वानखेडे यांच्या वडिलांनी ट्विट करण्यापासून रोखण्यासाठी व मीडियावर त्यांच्या संदर्भात बोलण्यावर बंदी घालावी अशी मागणी न्यायालयाकडे केली, असे मलिक यांनी सांगितले. समीर वानखेडे यांच्या विरुद्धचे सर्व पुरावे न्यायालयात दाखल केले जातील असेही मलिक यांनी सांगितले.

“समीर वानखेडेंचा फर्जीवाडा आता हळूहळू समोर येऊ लागला आहे. शेजारी राहणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याशी वानखेडेंचा वाद झाल्यानंतर त्यांच्या मुलाला खोट्या आरोपांखाली फसवण्याचं काम केलं. त्यांनी एनडीपीएस कोर्टात दाखल केलेल्या जामीन अर्जात आयपीएस अधिकाऱ्यानं मागणी केली आहे की, त्या इमारतीतील सीसीटीव्ह तपासून पाहा. त्यांच्या घरी कोणताही छापा पडला नाही. वानखेडे आणि त्यांचे अधिकारी त्या इमारतीच्या आवारात फिरत होते. मुलाला घरातून बोलावून घेतलं आणि बोगस केस करुन ड्रग मिळाल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला.”, असं स्पष्टीकरण देत पुन्हा एकदा नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप लावले आहेत.

पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले की, “ज्या मुलीशी लग्न करुन घटस्फोट दिलाय. वाद निर्माण झाल्यानंतर ती मुलगी समोर येऊन समीर वानखेडेंचं सत्य समोर आणेल. या भितीपोटी एका ड्रग पेडलरच्या माध्यमातून त्या मुलीच्या मामेभावाजवळ ड्रग पोहोचवण्यात आलं. त्यानंतर राज्य सरकारची एजन्सीच्या माध्यमातून अटक करण्याचं कटकारस्थान रचलं. आजही तो मुलगा तुरुंगात आहे. त्याला अडकवल्यानंतर त्याला समीर वानखेडे धमकी देत होते. जर माझ्याविरोधात बोलण्यासाठी तुम्ही समोर आले, तर संपूर्ण कुटुंबाला मी तुरुंगात टाकेल. अशी दहशत यांनी निर्माण केली होती.”

समीर वानखेडेंविषयीचा आणखी एक दाखला आणि मोठा गौप्सस्फोट मलिकांनी केला आहे. वानखेडेंचा शाळा सोडल्याचा दाखला मलिकांनी सादर केला. त्या दाखल्यामध्ये समीर वानखेडेंचं नाव समीर दाऊत वानखेडे असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. तसेच चौकशीतून सत्य बाहेर येईल असंही नवाब मलिकांनी स्पष्ट केलंय.

समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांचे शाळा सोडल्याचे दोन दाखले समोर आले आहे. या दोन्ही दाखल्यांवर समीर वानखेडे यांच्या धर्माचा उल्लेख मुस्लिम आहे. वानखेडे हे मुस्लिम आहेत, असे नवाब मलिक म्हणाले. या संदर्भातील पुरावे न्यायालयात दाखल केली जातील असेही त्यांनी सांगितले.

समीर वानखेडे यांचे शाळा सोडल्याचे दोन दाखले समोर आले आहे. सेंट पॉल आणि सेंट जोसेफ या दोन शाळांचे दाखले समोर आले आहेत. शाळांच्या दाखल्यावर समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे. काल अभिनेत्री आणि पत्नी क्रांती रेडकरने हिने समीर वानखेडे यांचा जन्मदाखला ट्विट केला होता. त्या दाखल्यावर समीर यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव वानखेडे, असे लिहले होते. हेच दाखले नवाब मलिक न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती दिली.

समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांची सिद्धता होण्यासाठी आणि वानखेडे यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या मानहानी याचिकेविरोधात आणखी काही कागदपत्रे विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Hight Court) सादर करण्यात आली आहेत.

या कागदपत्रांमध्ये समीर वानखेडे यांचा शाळेचे प्रवेश पत्र आणि प्राथमिक शाळेचा सोडल्याचा दाखल सादर केला. त्यावर समीर वानखेडे हे ‘मुस्लीम’ असल्याचे नमुद केले आहे. नवाब मलिक आरोप करताना म्हणाले, समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम असून त्यांनी केंद्र सरकारची नोकरी मिळविताना अनुसुचित जातीचे (शेड्युल कास्ट) असल्याचे दाखवले आहे. हा फर्जिवाडा आहे. त्यांची नोकरी जाणार.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here