Jitendra Awhad Arrested: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक

Jitendra Awhad Arrested: जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांच्यासह एकूण 12 जणांना अटक करण्यात आली आहे

0

ठाणे,दि.11: Jitendra Awhad Arrested: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक करण्यात आली आहे. ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव या चित्रपटाचा शो जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला, यावेळी एका प्रेक्षकाला मारहाणही करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांच्यासह एकूण 12 जणांना अटक करण्यात आली आहे. वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर ही कारवाई केली आहे.

दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईबाबत जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक निकम यांचा फोन आला. नोटीस घेऊन मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या, असं ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघत होतो, त्यामुळे मी पोलीस स्टेशनला येतो, मग मुंबईला जातो, असं मी त्यांना सांगितलं,’ असं आव्हाड म्हणाले.

हेही वाचा BCCI: T20 संघात विराट कोहली आणि रोहित शर्माला स्थान नाही?

‘मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड पोलीस स्टेशनला आले, त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की मी काही करू शकत नाही. वरून आदेश आले आहेत, तुम्हाला अटक करावी लागेल,’ असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांना आजच ठाणे कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आज सुनावणी झाली तर आव्हाड यांना आजच जामीन मिळण्याची शक्यता आहे, पण सुनावणी झाली नाही तर त्यांना सोमवारपर्यंत जेलची हवा खायला लागू शकते, कारण उद्या आणि परवा शनिवार-रविवार असल्यामुळे कोर्ट बंद आहे.

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आव्हाडांच्या अटकेवर टीका केली आहे. ‘राज्यात चाललंय काय? जो चूक करतो त्यांना माफी जो आंदोलन करतो त्यांना जेल ब्रिटीश राज, आव्हाड लढवैय्या नेता आहे. शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, या कामासाठी आम्ही सगळे जेलमध्ये जायला तयार आहोत. जेलभरो आंदोलन करणार आहे. शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. भाजपने स्पष्ट करावं की ते शिवाजी महाराज विरोधी आहे की नाही,’ असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here